(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Updates : दिलासा! कोरोनाचा आलेख घसरला, पाच हजार नवीन रुग्णांची नोंद, 29 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus Cases Today : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 747 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा आलेख पुन्हा एकदा घसरला आहे. देशात पाच हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात शनिवारी दिवसभरात म्हणजे गेल्या 24 तासांत 5 हजार 747 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याआधी शुक्रवारी 6298 नवीन रुग्ण कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 23 रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही आकडेवारी पाहता कोरोनाबाधितांची संख्या घटली असून कोरोनाबळींच्या मृत्यूमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं. देशातील कोरोना रुग्णांमध्ये 551 रुग्णांची घट झाली आहे.
देशात एकूण 5 लाख 28 हजार 302 रुग्णांचा मृत्यू
भारतात बुधवारी दिवसभरात 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना महामारी पसरण्यास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 302 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 748 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. सध्या देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.11 टक्के आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.71 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 46 हजारांहून जास्त उपचाराधीन रुग्ण आहेत. सध्या देशात 46 हजार 848 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
#COVID19 | India reports 5,747 fresh cases and 5,618 recoveries, in the last 24 hours.
— ANI (@ANI) September 17, 2022
Active cases 46,848
Daily positivity rate 1.69% pic.twitter.com/pjklrIxzhq
शुक्रवारी राज्यात 697 कोरोना रूग्णांची नोंद
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहे. मागच्या आठवड्यात कमी होत असलेल्या रूग्ण संख्येत या आठवड्यात चढ-उतार होत आहे. शुक्रवारी राज्यात 697 नव्या कोरोना रूग्णांची नोंद आणि दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. शुक्रवारी राज्यात 755 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. तर आज राज्यात दोन कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. रूग्ण संख्येत चढ-उतार होत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे नव्या कोरोना रूग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवरी राज्यात 984 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 79,61, 282 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.11 टक्के एवढे झाले आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) September 17, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/gi6zPgkBit pic.twitter.com/48Xa54Aiyo
महत्त्वाच्या इतर बातम्या