एक्स्प्लोर

मुंबईत आठ ते नऊ लाख बोगस मतदार : संजय निरुपम

मुंबईमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये 15 ते 20 हजार, तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक ते दीड लाख बोगस मतदारांची नोंद झालेली आहे, असा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंबईत बोगस मतदारांचा सुळसुळाट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईतील मतदार यादीमध्ये सुमारे 8 ते 9 लाख बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. मुंबईमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये 15 ते 20 हजार, तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक ते दीड लाख बोगस मतदारांची नोंद झालेली आहे, असा दावा निरुपम यांनी केला आहे. निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी  कार्यालयाने कडक पावलं उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. एकाच व्यक्तीच्या नावे 11 ते 13 मतदान ओळखपत्रं आढळून आलेली आहेत. एखाद्या मतदारसंघात एक मतदार, परंतु त्याची विविध जाती-धर्माची वेगवेगळी नावं, वेगवेगळे पत्ते, वेगवेगळी वयोमर्यादा, वेगवेगळे बूथ नंबर मिळालेले आहेत, असा दावा संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मागठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आहेत.  तिथे मतदार ओळखपत्रांमध्ये 838 पैकी फक्त 182 खरे मतदार आहेत, तर दिंडोशी विधानसभा मतदारसंघामध्ये जिथे शिवसेनेचेच आमदार सुनील प्रभू आहेत, तिथे 552 पैकी फक्त 290 खरे मतदार आहेत, असा आरोप संजय निरुपम यांनी केला. सुमारे 15ते 20 हजार बोगस मतदार ओळखपत्रं अणुशक्ती नगर, मानखुर्द शिवाजी नगर आणि चांदिवली भागात सापडली आहेत. निवडणूक आयोगाने 31 जानेवारी 2019 पर्यंत ड्राफ्ट रोल जाहीर करण्यापूर्वी सर्व बोगस मतदार ओळखपत्र या मतदार यादीतून वगळावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आआरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray बिनडोक राजकारणी;त्यांच्यामुळे गद्दारीचं गालबोटसकाळी ११ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 24 January 2025ST Fare hike : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा मोठा निर्णयNalasopara : अनधिकृत इमारतीवर कारवाई, रहिवाश्यांना बांबू, चादरी टाकून राहण्याची वेळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आआरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Rohit Sharma : रोहित शर्मा आक्रमक सुरुवातीनंतर पुन्हा फसला, हिटमॅन जम्मू काश्मीरच्या जाळ्यात अडकला, मुंबईला मोठा धक्का
हिटमॅन आक्रमक सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी, रोहित शर्मा बाद होताच मुंबईला मोठा धक्का
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
Embed widget