एक्स्प्लोर

आभासी चित्र निर्माण करण्याचं काम तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला भाई जगताप यांचं उत्तर

देवेंद्र फडणवीस म्हणत होते राज्यात लसीकरण होत नाही परंतु महाराष्ट्र लसीकरणात प्रथम क्रमांकावर आहे. आता हे आभासी आहे का?  असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला.

मुंबई : कोरोना हाताळण्याच्या बाबतीत सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासमोर आभासी चित्र निर्माण करत आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम व्यवस्थितरित्या कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्या आकडेवारीच्या आधारे कोरोना टेस्टिंग कमी झाले असून तो वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये तथ्य वाटतं नाही. मुळात त्यांनी जी आकडेवारी दिली आहे यावरच आमचा विश्वास नाही अशा शब्दात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आभासी चित्र निर्माण करण्यापेक्षा टेस्टिंग वाढवा या दिलेल्या सल्ल्याचा समाचार घेतला. 

याबाबत अधिक बोलताना भाई जगताप म्हणाले की, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता संवेदनशील राहिले नाहीत. आभासी चित्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. गुजरातच्या हायकोर्टाने त्यांना सूचना केल्या आहेत की महाराष्ट्र राज्याने  कोरोना रोखण्यासाठी ज्या पद्धतीने काळजी घेतली आहे. त्या पद्धतीने तुम्ही देखील काळजी घ्यायला हवी. अलीकडच्या काळात फडणवीस यांच वागणं बदललं आहे. नागरिक त्यांना नावं ठेवत आहेत आणि त्यातून वाचण्यासाठी असा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. त्यांच्या आकडेवारी वर आमचा विश्वास नाही. देवेंद्र फडणवीस म्हणत होते राज्यात लसीकरण होत नाही परंतु महाराष्ट्र लसीकरणात प्रथम क्रमांकावर आहे. आता हे आभासी आहे का? 

देशात सर्वात जास्त वाईट परिस्थिती महाराष्ट्रमध्ये झाली असताना देखील मुख्यमंत्री यांनी याविरोधात चांगलं काम केलं आहे. माझा सवाल आहे फडणवीस तुम्हाला.. का तुम्ही लसीकरण, ऑक्सिजन कमतरता याबाबत बोलत नाहीत. त्यामुळे त्यांनी जो पत्र लिहून आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे तो चुकीचा आहे. ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रकोप झाला होता त्यावेळी यांनी केवळ हवाई दौरा केला परंतु केलं काहीच नाही. शेवटी कोल्हापूरच्या नागरिकांनी त्यांना आव्हान केलं होतं की इकडं फिरून दाखवा..ते गेले सुद्धा नाहीत. नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत प्रचंड नाराजीचा सूर आहे, असेही जगताप म्हणाले. 

दरम्यान विरोधीपक्ष नेते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून  भय नको, पण आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणाही नको! कोरोना चाचण्या, त्यातही आरटीपीसीआर प्रमाण वाढवा अशी मागणी केली आहे.
कोरोनाचे भय वाढणार नाही, याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अचूक बळीसंख्या यातूनच कोरोनाविरोधातील लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून सांगितले आहे.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Tukaram Mundhe School Canteen Marathi News: आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
Eknath Shinde Uddhav Thackeray: मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Mumbai New Mantralay: मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
Pune Hinjewadi Metro: पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
Eknath Shinde Uddhav Thackeray: मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहि‍णींची अंतिम आकडेवारी समोर, 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र
लाडकी बहीण योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र, आकडेवारी समोर
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Embed widget