एक्स्प्लोर

विधानसभेच्या तोंडावर सत्ताधारी जोमात, काँग्रेस मात्र अजूनही निराशेच्या गर्तेत

शून्यातून बाहेर न येण्याच्या मनस्थितीत असलेली मुंबई काँग्रेस पाहता, रणांगणावर पोहचण्याआधीच काँग्रेसने शस्त्र टाकल्याचे चित्र आहे.

मुंबई : विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर आली आहे. एकीकडे मुख्यमंत्री विकास यात्रा काढणार आहेत तर आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. पण काँग्रेस मात्र अजून ही निराशेच्या गर्तेत असल्याचं चित्र आहे. नुकतीच मंगल प्रभात लोढा यांची भाजप मुंबई अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मुंबईत विधानसभा निवडणुकीत 36-0 करुन दाखवा असे लोढा यांना सांगितलं. मुंबईतील 36 जागांवर भाजप आक्रमक असताना मुंबई काँग्रेस मात्र अजून ही अध्यक्षांच्या प्रतीक्षेत आहे. लोकसभा निवडणूक असताना संजय निरुपम यांच्याकडून मुंबई काँग्रेसची धुरा मिलिंद देवरा यांना देण्यात आली. त्यांनी पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिला. त्यामुळे मुंबईत सध्या झालेले अनेक अपघात, जीवितहानी अशा वेळी सरकारला धारेवर धरायला मुंबई काँग्रेसचा नेता दिसला नाही. मालाडमध्ये भिंत कोसळून लोकांचा मृत्यू झाला, तर डोंगरीत इमारत कोसळून लोकांचे जीव गेले. मॅनहोलमध्ये पडून मुलांचे जीव गेले, अशावेळी सत्ताधारी भाजप-शिवसेनेला जाब विचारण्याऐवजी मुंबई काँग्रेसचे नेते एकमेकांशी ट्विटरवरून भांडताना दिसत होते. त्यामुळे विधान सभा निवडणुकीत मुंबई काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न अजून ही अनुत्तरित आहेत. महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस वेणूगोपाल कर्नाटकातील सरकार वाचवण्याच्या गडबडीत असल्याने मुंबई काँग्रेसचा निर्णय प्रलंबित आहे. मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे की मिलिंद देवरा मुंबई अध्यक्षपदी कायम राहणार असून महाराष्ट्र काँग्रेसप्रमाणे त्यांनाही दोन कार्याध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ गायकवाड आणि हुसेन दलवाई या नेत्यांची नावं कार्याध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. विविध समाजाला प्रतिनिधित्व द्यावे आणि सामूहिक जबाबदारी या दृष्टीतून या नेमणुका होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. पण प्रश्न हाच उरतो एकीकडे सगळ्या जागा जिंकण्याच्या जोशात असलेली भाजप आणि शून्यातून बाहेर न येण्याच्या मनस्थितीत असलेली मुंबई काँग्रेस पाहता, रणांगणावर पोहचण्याआधीच काँग्रेसने शस्त्र टाकल्याचे चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
Embed widget