एक्स्प्लोर

Chinchpokali : कार्यकर्त्यांची अरेरावी, चिंचपोकळी मंडळाच्या कार्यकर्त्यांची भाविकाला मारहाण

Chinchpokali Chintamani : चिंचपोकळी मंडळाचे कार्यकर्ते भाविकांना मारहाण करत असल्याचा व्हिडीओ समोर आला असून त्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.

मुंबई: चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेशोत्सव मंडळाच्या (Mumbai Chinchpokli Chintamani Mandal)  कार्यकर्त्यांनी भाविकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाविकांची गर्दी नियंत्रणात करत असताना बॅरिकेट्स लावण्यात येत होते, त्यावेळी काही भाविक आतमध्ये शिरले. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाविकाला मारहाण केल्याची घटना घडली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीवर सर्व स्तरातून टीका होत आहे. 

शनिवारी रात्रीचा हा व्हिडीओ आहे. शनिवार-रविवार असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक घराबाहेर पडल्याचं दिसून आलं. त्याचवेळी चिंचपोकळीच्या गणेश मंडळामध्ये (Mumbai Chinchpokli Chintamani Mandal) हा प्रकार घडल्याचं समोर आलं. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत होते. त्या दरम्यान ही घटना घडली. 

एका तरुणाला मंडळाचे पाच-सहा कार्यकर्ते मारहाण करत असल्याचं या व्हिडीओतून स्पष्ट दिसतंय. या ठिकाणी जवळपास पोलीसही दिसत नाहीत.

दरम्यान, चिंचपोकळीतील व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर मंडळाचे सचिव प्रणील पांचाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, "गणेश दर्शनासाठी झालेली ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. कार्यकर्त्यांनी त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मारहाण झालेला तो मुलगा नशा करुन आला होता. तसेच त्याने महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हा प्रकार घडला. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नव्हता. गर्दीच एवढी होती की त्या ठिकाणी कुणाला जाता आला नाही."

या आधी कोणत्याही भाविकाला काही ईजा झाली तर त्याच्यावर मंडळात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत असं सांगत प्रणील पांचाळ म्हणाले की, आम्ही पोलिसांकडे अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी केली आहे. 

या आधी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या एका महिला भाविकाची सुरक्षा रक्षकासोबत बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची अरेरावी वाढली असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची अरेरावी कुठेतरी थांबली पाहिजे अशी प्रतिक्रिया भाविकांतून व्यक्त होत आहे. 

Chinchpokali Chintamani Marhan: चिंतामनीच्या दरबारात मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश भक्ताला मारहाण

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget