एक्स्प्लोर
मुंबईच्या चेंबुरमध्ये भरदिवसा तरुणीची हत्या, आरोपी पसार
![मुंबईच्या चेंबुरमध्ये भरदिवसा तरुणीची हत्या, आरोपी पसार Mumbai Chembur Girl Killed मुंबईच्या चेंबुरमध्ये भरदिवसा तरुणीची हत्या, आरोपी पसार](https://static.abplive.com/abp_images/706113/thumbmail/chaku_suri_koyata_murder_kill.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : चेंबुरमधील सुमननगरमध्ये भरदिवसा 19 वर्षीय तरुणीच्या हत्येने खळबळ उडाली आहे. चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा रुग्णालयात मृत्यू झाला.
चेंबूरच्या सुमननगर येथील अण्णाभाऊ साठे उद्यानाजवळ ही घटना घडली. मृत तरुणीचं नाव करिश्मा असल्याची माहिती आहे. करिश्मा कामावर जात असताना एका तरुणाने मागून येऊन तिच्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली.
त्यानंतर तिला सुराणा-सेठीया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान तरुणीवर हल्ला करणारा कोण होता याचा शोध अजून लागलेला नाही. मात्र प्रेमप्रकरणातून तरुणीवर हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
राजकारण
बातम्या
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)