एक्स्प्लोर
मुंबईत इमारत दुर्घटना टळली, घाटकोपरमध्ये बिल्डिंग झुकली
इमारत 60 वर्षांपेक्षा जुनी असल्यानं मालक आणि भाडेकरुंच्या वादातून इमारतीचा पुनर्विकास रखडला होता
मुंबई : मुंबईच्या घाटकोपरमध्ये साईदर्शन इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली. घाटकोपर पूर्वमध्येच रायगड चौकामध्ये असलेली डॉ. रामदी सदन इमारत एका बाजूला झुकली. मात्र वेळीचा हा प्रकार लक्षात आल्याने रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं.
तळमजला अधिक दोन मजले अशी या इमारतीची रचना आहे. इमारत 60 वर्षांपेक्षा जुनी असल्यानं मालक आणि भाडेकरुंच्या वादातून इमारतीचा पुनर्विकास रखडला होता. आज संध्याकाळी इमारत झुकल्याचं नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
इमारत एका बाजूला कलंडल्यानं इमारतीतील 33 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. घटनास्थळी पोलिस प्रशासनाने बंदोबस्त लावला असून धोकादायक बांधकाम तोडण्याचे काम पालिकेने सुरु केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
Advertisement