एक्स्प्लोर

वांद्रे वरळी सी लिंकच्या दोन गर्डरची उंची खाली-वर का? समोर आलं मोठं कारण

Bandra Worli Sea Link : कोस्टल रोड वांद्रे वरळी सी लिंकला जोडणाऱ्या कनेक्टरच्या दोन गर्डरची उंची खाली-वर असल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचं दिसतंय.

मुंबई : कोस्टल रोड वांद्रे वरळी सी लिंकला जोडणाऱ्या कनेक्टरमधील दोन गर्डरची उंची एकसमान नसल्याचं दिसतंय. त्यामुळे या कनेक्टर संदर्भात समाज माध्यमांमध्ये  काही प्रश्न निर्माण होत आहेत. कनेक्टरमध्ये वापरण्यात येणारे हे दोन गर्डर  बांधकामाच्या वेळी उंचीमध्ये खाली-वर तर झाले नाही ना? अशा प्रकारचे प्रश्न  मुंबईकरांकडून विचारले जात होते. त्यावर प्रकल्पाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि अभियंतांनी या सगळ्यामधील संभ्रम दूर केला आहे.

कनेक्टरमधील दोन गर्डरची उंची समान का नाही?

कोस्टल रोड वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यासाठी 2 महाकाय बो स्ट्रिंग आर्च गर्डरची जोडणी करण्यात आली आहे. एकाची लांबी 27 मीटर तर दुसऱ्याची 17 मीटर लांब आहे. या महाकाय गर्डरचे वजन पेलण्यासाठी गर्डरच्या खाली एकीकडे 3 मीटर तर दुसरीकडे साडे तीन मीटर उंचीचा आधार देण्यात आला आहे. 

त्यामुळे दोन्ही गर्डरच्या उंचीत साधर्म्य दिसून येत नसल्याचे कोस्टल रोडसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय वांद्रे वरळी सी लिंकला मारिन लाईन्सवरून जाणारा रस्ता या गर्डरवरून वक्र होऊन गेला असल्याने तो दिसताना वर खाली दिसत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

भौतिकशास्त्राच्या नियमानुसार ही कुठल्याही प्रकारे चूक नसून योग्य पद्धतीने काम करण्यात आला आहे. रस्ता हा वळणाचा असल्यामुळे येथे सुपर एलेवेशन असणार आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कोस्टल रोड पालिकेसाठी महत्त्वाचा प्रकल्प असून त्याच्या जोडणीत कुठेही हयगय केली जाणार नाही, त्यामुळे मुंबईकरांनी भीती बाळगू नये असे म्हणणे अधिकाऱ्यांनी मांडले.

ही बातमी वाचा : 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये, मनिषा तुपेंचं सुनील तटकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये, मनिषा तुपेंचं सुनील तटकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 
Video: लग्नातील लाखोंच्या खर्चाला फाटा दिला अन् दोघांनी मिळून त्याच खर्चात नवा फ्लॅट घेतला अन् त्याच फ्लॅटमध्ये मोजक्या लोकांमध्ये लग्नाची गाठ बांधली!
Video: लग्नातील लाखोंच्या खर्चाला फाटा दिला अन् दोघांनी मिळून त्याच खर्चात नवा फ्लॅट घेतला अन् त्याच फ्लॅटमध्ये मोजक्या लोकांमध्ये लग्नाची गाठ बांधली!
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो ई-केवायसी प्रक्रियेत चूक झाली असल्यास दुरुस्त करा, आदिती तटकरेंचं महत्त्वाचं आवाहन
लाडक्या बहिणींनो ई-केवायसी प्रक्रियेत चूक झाली असल्यास दुरुस्त करा, आदिती तटकरेंचं आवाहन
Embed widget