Mumbai Air Pollution : मुंबईतील हवा गुणवत्ता बिघडली, दिवाळीनंतर एक्यूआय पहिल्यांदाच 250 पार
Mumbai Air Pollution : मुंबईतील इतर स्टेशन्सवर देखील हवा निर्देशांक वाईट स्थितीत आहे. तर तीन स्टेशन्सवर हवा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट स्थितीत आहे.
मुंबई : राज्यात सध्या गारठा (Temperature) वाढत आहे. मुंबईच्या वातावरणात गारवा जाणवत असला तरी मुंबईतील हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून यंदा दिल्लीपेक्षा मुंबईतील हवा वाईट स्थितीत आहे. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) दिवाळीनंतर पहिल्यांदाच 250 पार गेला आहे.
मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्थितीत आहे. मुंबईतील एक्यूआय 262 वर आहे. मालाडचा एक्यूआय 320, माझगावचा एक्यूआय 316, बोरिवलीतील एक्यूआय 303 तर चेंबूरमधील286 वर गेला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक पाहता मुंबईपेक्षा तुलनेनं दिल्लीची हवा चांगल्या स्थितीत आहे. दिल्लीचा एक्यूआय 176 वर आहे. मुंबईतील इतर स्टेशन्सवर देखील हवा निर्देशांक वाईट स्थितीत आहे. तर तीन स्टेशन्सवर हवा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट स्थितीत आहे.
दिल्लीतील इतर भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक
- पुसा - 145
- लोधी रोड - 128
- दिल्ली विद्यापीठ - 303
- विमानतळ (टी-3) - 190
- नोएडा - 204
- मथुरा रोड - 193
- आयानगर - 176
- गुरुग्राम - 204
- धीरपूर - 218
हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांचे जमिनीवर राहात असल्याने हवेची गुणवत्ता चांगली असते. मात्र गेल्या काही दिवसांत वाढलेल्या वाहनांच्या धुरामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. हवेतील धूलिकणांची वाढती पातळी ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे मुंबईतील वातावरणात पर्टिक्युलेट मॅटर (पीएम) 2.5 आहे. PM 2.5 हे हवेतील लहान कण आहेत जे दृश्यमानता कमी करतात.
मुंबईतील हवेचा गुणवत्ता वाईट स्थितीत जाण्यास सुरु असलेले बांधकाम आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळीचे सूक्ष्म कण हवेत येतात. तसेच मुंबईतील संथ गतीने होणारी वाहतूक ही दोन प्रमुख कारणे आहे.
पीएम 2.5 मुळे अनेक आजार होतात
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पीएम 2.5 चे प्रमाण जास्त असल्याने फुफ्फुसाचा कर्करोग आणि अनेक प्रकारचे श्वसनाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांना संसर्ग आणि हृदयविकाराचा धोकाही उद्भवू शकतो.
हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?
शून्य ते 50 एक्यूआय - उत्तम
50 ते 100 एक्यूआय - समाधानकारक
101 ते 200 एक्यूआय - मध्यम
201 ते 300 एक्यूआय - खराब
301 ते 400 एक्यूआय - अतिशय खराब
401 ते 500 एक्यूआय - गंभीर