एक्स्प्लोर

Mumbai Accident : मुंबईत दोन बेस्ट बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

Mumbai Accident : मुंबईत आज पहाटे घडलेल्या बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. बेस्टच्या दोन बस आणि एका ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला.

Mumbai Accident : मुंबईत (Mumbai) आज पहाटे घडलेल्या बेस्ट बसचा (BEST Bus) भीषण अपघात (Accident) झाला. बेस्टच्या दोन बस आणि एका ऑटोरिक्षा (Autorickshaw) यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या (Eastern Express Highway) गोरेगाव चेक नाका पुलावर ही घटना घडली. जॉनी संखाराम (वय 42 वर्षे) आणि सुजाता पंचकी (वय 38 वर्षे) अशी मृतांची नावं आहेत.

एक बस घसरुन आधी दुसऱ्या बसला, मग रिक्षाला धडकली

या अपघातात बस क्रमांक 1453 (एमएच 01 एपी 0226) आणि बस क्रमांक 1862 (एमएच 01 एपी 0746) या दोन्ही बस आगार ट्रान्सफरसाठी पोईसर डेपोहून घाटकोपर डेपोकडे जात होत्या. संतोष विष्णू देवूलकर (53) हे बस क्रमांक 1453 चालवत होते, तर बस क्रमांक 1862 संतोष शंकर घोंगे (45) हे चालवत होते.

पहाटे पावणे दोनच्या सुमारास, बस क्रमांक 1862 च्या चालकाने ब्रेक लावला आणि बस क्रमांक 1453 च्या चालकालाही असं करण्यास सांगितलं. मात्र मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते निसरडे झाले असल्याने, बस क्रमांक 1453 घसरली आणि आधी बस क्रमांक 1862 आणि नंतर ऑटोरिक्षाला (एमएच 02 ईक्यू 9371) धडकली.

रिक्षातील दोन्ही प्रवाशांचा मृत्यू, चालकाला किरकोळ दुखापत

या अपघातात ऑटोरिक्षातील जॉनी संखाराम आणि सुजाता पंचकी हे प्रवासी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र जॉनी संखाराम यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच पहाटे पावणे तीन वाजता मृत घोषित करण्यात आलं. सुजाता पंचकी यांना अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं, जिथे पहाटे पावणे चार वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

तर रिक्षाचालकाच्या डाव्या गालाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरु आहेत. 

मुंबईत हिट अँड रन प्रकरण

मुंबईत चालकाने ब्रेक लावण्याऐवजी चुकून ऐक्सलेटर दाबल्यामुळे भीषण अपघात झाला आणि यात 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना 28 जून रोजी घडली होती. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला होता. मुंबईतील मुलुंड परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपी अमरीश यादव महाविद्यालयीन विद्यार्थी असून तो 22 वर्षांचा आहे. आरोपीने दिलेल्या जबाबानुसार, ब्रेक लावण्याऐवजी गोंधळून एक्सलेटर दाबल्यामुळे गाडीचा वेग वाढला आणि त्यातच हा अपघात झाला. अपघातानंतर घाबरुन गेल्याने कार तिथच सोडून पळ काढल्याचंही चालकाने सांगितलं.

हेही वाचा

Mumbai Accident: ब्रेकऐवजी एक्सलेटर दिला अन्...; मुंबईत हिट अँड रन केस, फरार चालक अटकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसतेPraful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget