एक्स्प्लोर
मुंबई विद्यापीठाचं ‘मुंबई-ई-सुविधा’ अॅप लाँच, परीक्षेच्या तारखा, वेळापत्रकांसह अनेक सुविधा
अॅपद्वारे प्रवेशापासून ते परीक्षेच्या प्रवेशपत्रापर्यंतची सर्व माहिती उपलब्ध होणार आहेत. तसेच परीक्षेच्या तारखा, परीक्षेचे वेळापत्रक, हॉलतिकीट अशा सुविधाही या अॅपद्वारे दिल्या जाणार आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठात शुक्रवारी 24 ऑगस्टला ‘मुंबई-ई-सुविधा’ नावाचं अॅप लाँच करण्यात आलं. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या टप्यात 6 लाख विद्यार्थी तर 791 महाविद्यालयास जलद संवादाचे माध्यम म्हणून विद्यापीठानं हे मोबाईल अॅप लाँच केलं. कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते या अॅपचं उद्घाटन करण्यात आलं.
अॅपद्वारे प्रवेशापासून ते परीक्षेच्या प्रवेशपत्रापर्यंतची सर्व माहिती उपलब्ध होणार आहेत. तसेच परीक्षेच्या तारखा, परीक्षेचे वेळापत्रक, हॉलतिकीट अशा सुविधाही या अॅपद्वारे दिल्या जाणार आहेत. महाविद्यालय विद्यार्थ्यास विविध सूचना या अॅपमार्फत पाठवू शकणार आहेत. मुंबई विद्यापीठसुद्धा महाविद्यालयास विविध सूचना या अॅपद्वारे पाठवू शकते. तसेच महाविद्यालयास या अॅपमधून प्रवेश आणि परीक्षा संबंधाची सर्व माहिती मिळते. यामुळे कॉलेज व विद्यार्थ्यास विद्यापीठाच्या विविध सूचना तात्काळ प्राप्त होतील.
‘मुंबई-ई-सुविधा’ हे मोबाईल अॅप अँड्रॉइड धारकांसाठीच उपलब्ध आहे. प्लेस्टोअरमधून सर्वांना हे अॅप Mum-e-Suvidha या नावाने डाऊनलोड करता येईल. विद्यार्थांना विद्यापीठाने दिलेला पीआरएन हा 16 अंकी क्रमांक त्याचा युजर आयडी असेल आणि पासवर्ड कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्याना दिला जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement