एक्स्प्लोर
Advertisement
अनंत अंबानीने तब्बल 108 किलो वजन घटवलं!
मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर काल मुंबई विरुद्ध पुणे संघाचा सामना सुरु असताना एक-दोन वेळा कॅमेरा एका अशा व्यक्तीकडे गेला, ज्यामुळे पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ती व्यक्ती म्हणजे रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी.
आपल्या वजनामुळेच कायम चर्चेत राहिलेल्या अनंत अंबानीने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल, एवढं वजन कमी केलं आहे. अनंत अंबानीने 18 महिन्यात तब्बल 108 किलो वजन कमी केलं आहे. विशेष म्हणजे एवढं वजन कमी करण्यासाठी अनंतने कोणतीही सर्जरी केली नाही.
विशेष म्हणजे वजन घटवण्यासाठी अनंत यांनी नैसर्गिक उपचार आणि व्यायामाची मदत घेतली आहे. 21 किलोमीटर चालणं, वेट ट्रेनिंग, कार्डिओ एक्सर्साईज हे अनंतच्या वजन कमी करण्यामागचं गुपीत आहे.
https://twitter.com/NitaMAmbani/status/718966446294851584
अतिशय काटेकोरपणे डाएट प्लॅन फॉलो केल्याचीही माहिती मिळते आहे. सलग 500 दिवस रोज चार ते पाच तास व्यायाम अनंत अंबानी करत असे.
नीता अंबानी यांनीही अनंतच्या व्यायामामधील सातत्याचं कौतुक केलं आहे. नीता अंबानी यांनी अनंतचे फोटो आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement