धक्कादायक! मुंबईतील व्यावसायिकाकडून एका आठवड्यात तब्बल 2.45 कोटी रुपयांची वीज चोरी
पनवेल मधील एका व्यावसायिकाला तब्बल 1.15 कोटी रुपयांची वीज चोरी करताना पकडण्यात आले. विशेष म्हणजे या व्यावसायिकाला एक आठवड्यापूर्वीच 1.3 कोटी रुपयांच्या वीजचोरीप्रकरणी दंड ठोठावण्यात आला होता.
मुंबई : महावितरणने कडक पावले उचलूनही वीज चोरी होण्याच्या प्रकारांवर आळा बसताना दिसत नाही. मुंबई सारख्या मोठ्या महानगरातही अशा घटाना आढळून येत आहेत. मुंबईतील पनवेल येथे अशीच एक घटना समोर आली. आहे. पनवेल मधील एका व्यावसायिकाला तब्बल 1.15 कोटी रुपयांची वीज चोरी करताना पकडण्यात आले. विशेष म्हणजे या व्यावसायिकाला एक आठवड्यापूर्वीच 1.3 कोटी रुपयांच्या वीजचोरीप्रकरणी दंड ठोठावण्यात आला होता. पहिला दंड ठोठावून एक आठवडा उलटण्याच्या आतच दुसऱ्यांदा वीज चोरी करताना त्याला पकडण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टोन क्रशिंगचा व्यवसाय करणारा आरोपी जियाउद्दीन पटेल याने ही वीज चोरी केली आहे. त्याने कमी रीडिंग दाखवण्यासाठी वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
आरोपीच्या स्टोन क्रशिंग युनिटमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर महावितरणने त्याच्या दुसऱ्या युनिटवरही छापा टाकला. त्यावेळी त्याने दुसरी चोरी केल्याचे समोर आले.
पोलिसांनी सांगितले की, पनवेल महानगर पोलिस ठाण्यात व्यावसायिकासह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हरियाणात पकडली 2,500 वीज चोरीची प्रकरणे
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीस, हरियाणातील पॉवर युटिलिटीजच्या अधिकार्यांनी राज्यातील पाच शहरांमधील प्रतिष्ठीत उद्योग आणि व्यावसायिकांवर छापे टाकून जवळपास 2,500 वीज चोरीची प्रकरणे शोधून काढली होती.
वीजचोरीची प्रकरणे शोधण्यासाठी नियमित छापे टाकण्यात येत असले तरी, वीजचोरीमध्ये उद्योग आणि मोठ्या व्यावसायिकांचा हातभार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ऊर्जामंत्री रणजित चौटाला यांनी या विशेष छापेमारीची योजना आखली होती. "मोठ्या वीज चोरांना सोडले जाणार नाही" असा संदेश देण्यासाठी, मोठ्या उद्योगांमधील चोरी शोधण्यासाठी छापे टाकण्याचे नियोजन केले गेले. हरियाणाचे उर्जा मंत्री रणजीत चौटाला यांनी या निर्णयाला राज्याच्या इतिहासातील अभूतपूर्व असे म्हटले आहे.
वीज कर्मचाऱ्यांकडूनच चोरी
यापूर्वी 2020 मध्ये एका रात्रीत टाकलेल्या छाप्यात वीज विभागाचे तीन मुख्य अभियंते आणि पाच अधीक्षक अभियंत्यांसह नऊ अधिकारी कुंडी कनेक्शनद्वारे वीज चोरी करताना पकडले गेले होते. त्यांच्याकडून सात लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो शक्यतो लोकल प्रवास टाळा; मध्य रेल्वेवर 18 तासांचा 'जम्बो ब्लॉक'
- BEST Super Saver Plan : बेस्टचे सुपर सेव्हर प्लान; एका दिवसापासून 84 दिवसांपर्यंतच्या प्रवासाचं नियोजन शक्य
- मुंबई पालिकेच्या 117 अधिकाऱ्यांना कोरोना पावला? निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलं