एक्स्प्लोर
Mr. Beardsome | देखण्या दाढीवाल्यांची स्पर्धा
सुंदर स्त्री बघितल्यावर आपले मन जसे प्रफुल्लित होते तसेच नीटनेटका, टापटीप हँडसम मनुष्य पाहिल्यावर कदाचित मुलींना सुद्धा छान वाटत असेल. हा विचार मनात येऊन काही पुरुष आजकाल दिसण्यावर भर देत आहेत. त्यांच्यासाठी Mr. Beardsome 2019 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : स्त्री ही सौंदर्याच्या बाबतीत नेहमीच सजग असते. म्हणून काही नाहीच केलं तरी स्वतःला गृहिणी म्हणवणारी बाईसुद्धा आयब्रो करण्याच्या निमित्ताने का होईना पार्लरची पायरी चढतेच. म्हणजे सुंदर दिसणं हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. तर आपण कसे दिसतो यावर दुर्लक्ष करणं हा 'भारतीय पुरूषांचा' स्थायी भाव असूच शकतो इतकी कमालीची उदासिनता भारतीय पुरुषांमधे आढळते. ऑन द अदर हॅन्ड पुरुष हे लुक्सवर अजूनही फारसे लक्ष देत नाहीत. तब्येतीवर लक्ष नाही. कपड्यांचा सेन्स नाही, निळा, पांढरा, काळा, ग्रे या पलीकडे कपड्यांचे रंग नाहीत अश्या दुष्टचक्रात आमचे अनेक बांधव अडकले आहेत.
सुंदर स्त्री बघितल्यावर आपले मन जसे प्रफुल्लित होते तसेच नीटनेटका, टापटीप हँडसम मनुष्य पाहिल्यावर कदाचित मुलींना सुद्धा छान वाटत असेल. हा विचार मनात येऊन काही पुरुष आजकाल दिसण्यावर भर देत आहेत. आपापलं जे काय कार्यक्षेत्र असेल त्यात उत्तम करण्याचा प्रयत्न असतानाच ही मंडळी दिसण्यावर ही फोकस करत आहेत ही तशी सुखद बाब आहे. मग डायटवर लक्ष, व्यायाम, चांगले कपडे वापरणे, परफ्युम /जेल वगैरै, पार्लर ला कधीमधी भेट हे सगळं आलंच.
याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून निरनिराळ्या फॅशन येत असतात. सध्या दाढी वाढवण्याची फॅशन गेली काही वर्षे जोमात आहे. सोशल मीडिया हा त्याचा आरसाच. नो शेव्ह नोव्हेंबरचे निमित्त साधून, Brewing Beard या फेसबुक पेजमार्फत दरवर्षी फेसबुकवर देखणा दाढीवाला निवडण्याची स्पर्धा घेतली जाते. यंदाचे हे स्पर्धेचे चौथे वर्ष. यावर्षीदेखील या स्पर्धेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 468 पुरुषांनीं या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत भाग घेतला आहे. स्पर्धकांचे फोटो पेजवर अपलोड केले जातात. फेसबुक युजर्स त्यांना आवडलेल्या फोटोला लाईक करुन तसेच त्यावर रिऍक्ट होऊन आपले मत नोंदवू शकतात. आयोजकांतर्फे काही परीक्षक सुद्धा नेमण्यात आले आहेत. परीक्षकांचे 50% गुण आणि पब्लिक व्होटिंगचे 50% गुण यातून विजेता निवडला जातो. तसेच फक्त परीक्षकांनी दिलेल्या गुणांवर ज्युरी अवॉर्ड्स दिले जातात. विजेत्यांना Mr Beardsome या किताबासोबत रु. 5000(प्रथम), रु. 3000 (द्वितीय), रु. 1000 (तृतीय) अशी पारितोषिके दिली जातात.
दोन आठवड्यापूर्वी स्पर्धा चालू झाल्यापासून तीन लाखांपेक्षा जास्त फेसबुक युजर्सपर्यंत ही स्पर्धा पोहोचली आहे. सध्या गाजत असलेल्या 'डॉ बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत काम करणारी आदिती द्रविड यावर्षीच्या स्पर्धेचे निवेदन करत आहे. नुकतेच तिने फेसबुक लाईव्ह येऊन स्पर्धेची माहिती दिली आणि स्पर्धेसंबंधी प्रश्नांना लाईव्ह उत्तरे दिली.
सोमवारी दोन डिसेंबरला यावर्षीचा Mr Beardsome जाहीर होईल. सर्व महाराष्ट्राला यावर्षीचा विजेता कोण होईल? याची उत्सुकता लागून राहिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement