एक्स्प्लोर

अमोल यादवांच्या विमान कारखान्यासाठी पालघरमध्ये जागा मिळणार!

यासाठी अमोल यादव आणि राज्य सरकारमध्ये 35 हजार कोटींचा करार झाला आहे.

मुंबई : कॅप्टन अमोल यादव यांचं स्वदेशी विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता त्यांच्या विमान कारखान्यासाठी राज्य सरकारने जागाही दिली आहे. पालघरमध्ये एमआयडीसीमार्फत विमान कारखान्यासाठी जागा देण्यात येणार आहे. यासाठी अमोल यादव आणि राज्य सरकारमध्ये 35 हजार कोटींचा करार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. त्यामुळे अखेर अमोल यादव यांची प्रतीक्षा संपली आहे. आता राज्य सरकारने लवकरात लवकर या कराराची अंमलबजावणी करुन जागेचा ताबा द्यावा. कारखाना उभा करुन त्यामध्ये पहिलं विमान तयार होण्याची प्रतीक्षा आहे, असं अमोल यादव एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. भारतातील हा पहिलाच स्वदेशी विमान तयार करणारा कारखाना असेल, जो महाराष्ट्रात सुरु होत आहे. 20 नोव्हेंबर रोजीच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागाने अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करुन घेतलं होतं. त्यांना मुख्यमंत्र्यांकडून याबाबतचं पत्र देण्यात आलं होतं. पहिलं स्वदेशी विमान बनवण्याचा प्रवास विमानाच्या नोंदणीसाठी होणाऱ्या दिरंगाईवर विमान प्राधिकरणाची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली होती. मुंबईतील चारकोपमधल्या घराच्या छतावर अहोरात्र मेहनत करुन अमोल यादव यांनी तयार केलेलं विमान केवळ डीजीसीएची नोंदणी होत नसल्याने उड्डाणापासून रखडलं होतं. अखेर यादव यांच्या विमानाची नोंदणी पूर्ण झाली.

अमोल यादवांच्या पहिल्या स्वदेशी विमानाला लालफितीचा ब्रेक

2011 म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून अमोल यादव या विमानाच्या नोंदणीसाठी धडपडत आहेत. विशेष म्हणजे अमोल यादव यांचं हे विमान मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'मेक इन इंडिया वीक'मध्ये दिमाखात दाखवण्यात आलेलं होतं. त्यांच्या या प्रयत्नांचं कौतुक करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांपर्यंतही हा विषय पोहोचवला होता. महाराष्ट्र सरकारने या धडपडीचं कौतुक करत अमोल यांना 19 आसनी विमान बनवण्यासाठी जमीन आणि निधी देण्याचाही प्रस्ताव दिला होता. अमोल यांनी 19 आसनी विमानाचा प्रोटोटाईप पूर्णही करत आणला आहे. पण त्याआधी 6 आसनी विमानाचं यशस्वी उड्डाण करुन दाखवणं त्यांना आवश्यक आहे. जेणेकरुन महाराष्ट्र सरकारसोबतचा त्यांचा मदतीचा करार पूर्णत्वास जाईल.

अमोल यादवांच्या सहा आसनी विमानाची नोंदणी प्रक्रिया सुरु

ज्या प्रक्रियेसाठी भारतात 6 वर्षे गेली, ती अमेरिकेत एका महिन्याच्या आतही पूर्ण होऊ शकली असती. पण नोंदणी अमेरिकेत झाल्यास ते विमान स्वदेशी राहणार नाही, या भावनेतून अमोल यादव थांबले होते. संबंधित बातम्या :

विमानाची पहिली सफर आई-वडिलांना घडव, राष्ट्रपतींचा अमोल यादव यांना सल्ला

अमोल यादवांच्या विमानाचं नाव व्हीटी-नरेंद्र मोदी देवेंद्र'!

अमोल यादवांच्या सहाआसनी स्वदेशी विमानाचं अखेर रजिस्ट्रेशन

विमान निर्मिती क्षेत्रात क्रांती घडवणारा अवलिया, अमोल यादव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Embed widget