एक्स्प्लोर
6 वर्षात पहिल्यांदाच मान्सून लांबला
19 ऑक्टोबरला म्हणजेच तब्बल 23 दिवस उशीरानं मान्सूननं महाराष्ट्रातून एक्झिट घेतली आहे.

प्रातिनिधिक फोटो
मुंबई: राज्यभर आपली कृपा दाखवल्यानंतर अखेर मान्सूनराजा परतला आहे. मात्र यंदाच्या वर्षी मान्सूनराजानं सर्वाधिक काळ महाराष्ट्र मुक्काम केला. 19 ऑक्टोबरला म्हणजेच तब्बल 23 दिवस उशीरानं मान्सूननं महाराष्ट्रातून एक्झिट घेतली आहे. गेल्या 6 वर्षातली ही सर्वात उशीराची एक्झिट आहे. यंदा मान्सूननं राज्यभर आपली कृपादृष्टी दाखवली आणि महाराष्ट्राला ओलचिंब केला. यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. तब्बल 9 वर्षांनंतर जायकवाडी धरण 100 टक्के भरलं. तर दुष्काळी मराठवाड्यातलीही सगळी धरणं भरली आहेत. त्यामुळं मान्सूनचा हा लांबलेला मुक्काम महाराष्ट्राच्या फायद्याचाच ठरला असं म्हणावं लागेल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
पुणे
महाराष्ट्र
राजकारण






















