एक्स्प्लोर
चार्जिंगला लावलेल्या ओप्पो मोबाईलचा स्फोट
दिनानाथ यांनी काल दुपारी मोबाईल चार्जिंगला लावला होता. त्यावेळी अचानक मोबाईलमधून आधी धूर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर लगेचच मोबाईलचा स्फोट झाला.

वसई: चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना वसईत घडली. दिनानाथ दुबे यांच्या ओप्पो मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं खळबळ उडाली.
दिनानाथ यांनी काल दुपारी मोबाईल चार्जिंगला लावला होता. त्यावेळी अचानक मोबाईलमधून आधी धूर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर लगेचच मोबाईलचा स्फोट झाला. सुदैवानं यात कुणालाही इजा झाली नाही.
दिनानाथ यांनी 1 वर्षापूर्वी ओप्पो कंपनीचा मोबाईल खरेदी केला होता. महत्वाचं म्हणजे या मोबाईलमध्ये कोणताही बिघाडही झालेला नव्हता. पण तरीही या मोबाईलचा स्फोट झाला.
त्यामुळे मोबाईल वापरताना काळजी घेणं गरजेचं झालं आहे.
हल्ली मोबाईल स्फोट होण्याच्या घटना वाढल्या आहेत. कधी मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर, तर कधी चार्जिंगला लावून फोनवर बोलताना स्फोट झाला आहे.
मोबाईल फोन वापरताना कोणती काळजी घ्यावी?
चार्जिंग सुरु असताना कधीही मोबाईल फोनवर बोलू नये.
मोबाईल फोन रात्रभर चार्जिंगला लावू नये.
फोन चार्जिंग करताना तो लाकूड किंवा काचेच्या टेबलवर ठेवावा. पलंग किंवा उशीवर ठेवू नये.
संबंधित बातम्या
चार्जिंगवेळी मोबाईल बॅटरीचा स्फोट, तरुणाची बोटं रक्तबंबाळ
चार्जिंग करताना फोन उचलल्याने शॉक, मुंबईत तरुणाचा मृत्यू
मोबाईल चार्जिंग लावताना शॉक लागून मृत्यू
लॅपटॉप चार्जरनं घेतला युवकाचा बळी!
चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा ब्लास्ट, स्फोटात 24 वर्षीय युवकाचा मृत्यू
पँटच्या खिशात मोबाईलचा स्फोट
खिशातच मोबाईल पेटला, वाढत्या तापमानामुळे स्फोटाचा अंदाज
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























