एक्स्प्लोर

वृद्ध महिलेस मारहाण करणाऱ्याची पक्षातून हकालपट्टी, मनसेकडून दिलगीरी व्यक्त

MNS : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमनातून संताप व्यक्त केला जात होता.  आता मनसेकडून याबाबतची आपील भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

MNS : मुंबईतील नागपाडा परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिन्ही मनसे कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमनातून संताप व्यक्त केला जात होता.  आता मनसेकडून याबाबतची आपील भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महिलांचा सदैव आदार केलेला आहे. तशाच प्रकारचा सक्त आदेश कार्यकर्त्यांना सुद्धा दिला असताना सदर घडलेल्या घटनेबाब पक्षाच्या वतीने मी दिलगीरी व्यक्त करीत आहे, असे नांदगांवकर म्हणाले. पक्षाने याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतलेली असून, त्याचा एक भाग म्हणून कामाठीपूरा उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांस पदावरुन पदमुक्त करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. 

बाळा नांदगांकरांनी लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलेय?
एक सप्टेंबर 2022 रोजी कामाठीपरा या परिसरात घडलेली घटना पाहून मन: विषन्न झाले. पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महिलांचा सदैव आदार केलेला आहे. तशाच प्रकारचा सक्त आदेश कार्यकर्त्यांना सुद्धा दिला असताना सदर घडलेल्या घटनेबाब पक्षाच्या वतीने मी दिलगीरी व्यक्त करीत आहे. 

पक्षाने याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतलेली असून, त्याचा एक भाग म्हणून कामाठीपूरा उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांस पदावरुन पदमुक्त करण्यात येत आहे. 

भविष्यात या प्रकरणाची प्रतयक्ष माहिती घेऊन व सखोल चौकशी करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

महिलांचा व जेष्ठांचा आदर सन्मान हा राखला गेलाच पाहिजे...
धन्यवाद! 
                     जयहिंद! जय महाराष्ट्र!! 

                                                                आपला नम्र, 
                                                            बाळा नांदगांवकर

नेमकी घटना काय घडली?
३० ऑगस्ट रोजी मुंबईतल्या मुंबादेवीमध्ये हा सगळा प्रकार घडला. ज्या महिलेला मारहाण झाली... त्या महिलेचं नाव आहे प्रकाश देवी... या परिसरात त्यांचं मेडिकलचं दुकान आहे.... याच दुकानासमोर जाहिरातीचे फलक लावण्याचं काम सुरु होतं... हे काम मनसेचा पदाधिकारी विनोद अरगिलेच्या देखरेखीखाली सुरु होतं... पण हे जाहिरातीचे फलक लागले असते... तर या महिलेचं दुकान या फलकांच्या मागे लपलं गेलं असतं... म्हणून तिनं या फलकांना विरोध केला. इथेच अरगिलेचा पारा चढला. आणि त्यानं शिविगाळ सुरु केली. प्रकरण इतकं वाढलं...की अरगिलेनं प्रकाश देवी यांना थोबाडीत मारली. इतकंच नाही... तर ढकलूनही दिलं. शरमेची गोष्ट ही.की इतकं काही घडत असताना. एकही माणूस या महिलेच्या मदतीला धावला नाही.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Embed widget