एक्स्प्लोर

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या गाडीला अपघात, पुलावरून थेट रेल्वे रूळांवर कोसळली गाडी

मनसे आमदार राजू पाटील यांच्या गाडीला अपघात. कार थेट पुलावरून खाली रेल्वे रुळांवर कोसळल्याची घटना (बुधवारी) रात्री अकराच्या सुमारास घडली.

डोंबिवली : मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांची महागडी कार थेट पुलावरून खाली रेल्वे रुळांवर कोसळल्याची घटना (बुधवारी) रात्री अकराच्या सुमारास घडली. ही कार उड्डाणपुलावरून खाली दिवा पनवेल रेल्वे मार्गावर कोसळली असून सुदैवाने यात कोणीतही जीवितहानी झाली नाही. परंतु, लाखो रूपये किमतीची महागड्या गाडीचा मात्र चक्काचुर झाला आहे. निळजे आणि दातीवली रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या रोड ब्रिजवर हा अपघात झाला. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या गाडीला अपघात, पुलावरून थेट रेल्वे रूळांवर कोसळली गाडी खदिर इनामदार हा मनसे आमदार राजू पाटील यांचा चालक त्यांच्या नातेवाईकांना डोंबिवलीला सोडून पुन्हा पलवासिटीकडे येत होता. त्यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून थेट गाडी दिवा पनवेल रुळावर कोसळली. सुदैवाने याच वेळी कोणतीही रेल्वे रुळावरून ये जा करीत नव्हती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस, लोहमार्ग पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेन च्या सहाय्याने ही गाडी काढून घेतली आणि काही काळ बंद असलेला दिवा पनवेल लोहमार्ग पुन्हा सुरू करण्यात आला. अपघात झाल्यानंतर दिवा-पनेवल रेल्वे मार्गावरील वाहतूकही थांबवण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने रेल्वे रूळ तपासल्यानंतर ही वाहतूक पुन्हा सुरू केली. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या गाडीला अपघात, पुलावरून थेट रेल्वे रूळांवर कोसळली गाडी दरम्यान, प्रमोद पाटील यांना राजू पाटील या नावाने ओळखले जाते. यंदाच्या वर्षी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणूकांमध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राजू पाटील निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा पराभव करून त्यांनी विजय मिळवला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार निवडणून आले होते. पाहा व्हिडीओ : वाहतूक कोंडीबाबत मनसे आमदार राजू पाटलांकडून मनपा आयुक्तांची भेट

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget