एक्स्प्लोर
राष्ट्रवादीच्या मंचावरुन राज ठाकरेंची तोफ धडाडणार, मोदींविरोधी प्रचारासाठी मैदानात
लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसे इच्छुक नसली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादीची संयुक्त सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेने आघाडीच्या गोटात प्रवेश केला नाही, तरी प्रचार करण्यास मनसे तयार असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसे इच्छुक नसली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन राज ठाकरेंची तोफ धडाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनसेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना लोकसभा निवडणुका लढवण्याबाबतचा निर्णय मात्र राज ठाकरेंनी गुलदस्त्यात ठेवला होता. इतर पक्षांकडे जागा मागत बसायला मी प्रकाश आंबेडकर नाही, असा टोला राज यांनी लगावला होता.
अजित डोवालांच्या मुलाची पाकिस्तानी व्यापाऱ्यासोबत भागीदारी, राज ठाकरेंनी दाखवले पुरावे
लोकसभा निवडणुकीबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करेन, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी तरी मनसे महाआघाडीच्या वळचणीला जाणार नाही, असे संकेत राज ठाकरेंच्या बोलण्यातून मिळत आहेत. VIDEO | ठाकरे स्टाईलमध्ये प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल मनसेला केवळ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लढवण्यात रस आहे. मात्र लोकसभेच्या रिंगणात उतरलं नाही, तरी सरकारला पाडण्यासाठी मनसे मदत करणार असल्याचं म्हटलं जातं.काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी आणि युतीच्या सरकारविरोधात येतील त्यांना सोबत घेण्यास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या विरोधी भूमिकेमुळे मनसेच्या आघाडीप्रवेशाला खीळ बसू शकते.
राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध असले तरी त्यांच्या पक्षाचे विचार काँग्रेसशी जुळत नाही, त्यामुळे महाआघाडीत मनसेला स्थान नाही, असं अशोक चव्हाण यांनी 'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षा' या विशेष कार्यक्रमात पुन्हा स्पष्ट केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement