एक्स्प्लोर
Advertisement
मनसे कात टाकतोय? उत्तर भारतीय वागीश सारस्वत पक्षाचे नवे सरचिटणीस
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाचा झेंडा बदलत हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. तर, आज उत्तर भारतीय असलेले वागीश सारस्वत यांना पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्त केलंय.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय वागीश सारस्वत यांची पक्षाचे नवे सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे. मनसेच्या स्थापनेनंतर सुरुवातीला राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा हाती घेत उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन छेडले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच मनसेने आपला झेंडा बदलत आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. वागीश सारस्वत यांची नियुक्ती त्याच पार्श्वभूमीवर असल्याचे बोलले जात आहे. वागीश सारस्वत उत्तर प्रदेशातील अलिगडमधील आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा सोमवारी(9 मार्च)चौदावा वर्धापन दिन साजरा झाला आहे. आगामी काळातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेत यंदा पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात पार पडणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी राज यांनी सरचिटणीस म्हणून वागीश सारस्वत यांच्या नावाची घोषणा केली. वागीश सारस्वत हे आतापर्यंत पक्षाचे उपाध्यक्ष व प्रवक्ते होते. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हापासून वागीश राज यांच्यासोबत आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते नवभारत या हिंदी वृत्तपत्रात शिवसेनेचं बीट सांभाळत होते. 2008 मध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध आंदोलन सुरू केलं. तेव्हाही वागीश राज यांच्यासोबतच होते.
Shadow Cabinet | आदित्य, उद्धव ठाकरेंसह 'या' मंत्र्यांच्या खात्यांवर अमित ठाकरेंची करडी नजर
मनसेकडून हिंदुत्वाचा मुद्दा हाती
पक्षाच्या सरचिटणीसपदी उत्तर भारतीयाची निवड केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. मात्र, भाषिक राजकारण आणि प्रांतवादापासून मनसे हळूहळू दूर जात असल्याचा संकेत यातून देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. याच वर्षी 23 जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला झेंडा बदलला आहे. मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा आहे. तसंच झेंड्यात पूर्णपणे भगव्या रंगाला स्थान देण्यात आलं आहे. स्थापनेनंतर तब्बल 14 वर्षांनी मनसेच्या ध्वजाचा रंग आणि राजकारण दोन्हीही बदललं आहे.
'शॅडो कॅबिनेट' सरकारचे वाभाडे काढणार, चांगल्या कामाचं कौतुकही करणार : राज ठाकरे
वास्तविक राज ठाकरे यांना मराठीचा मुद्दा उपस्थित करून काही फायदा होत नव्हता. 2014 आणि 2019 मध्ये त्यांचा पक्ष केवळ एक जागा जिंकू शकला. अशा परिस्थितीत, शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेना हिंदुत्वापासून थोडी दूर गेली. हिच संधी साधून राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाला उभारी देण्यासाठी आपली भूमिका बदलल्याचं बोलंल जात आहे. भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजपशी हातमिळवणी करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
MNS 14th Foundation Day | 'शॅडो कॅबिनेट' सरकारचे वाभाडे काढणार; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
निवडणूक
Advertisement