Mhada Recruitment Paper Leak protest : राज्यात सरकारी नोकरभरती परीक्षा घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, त्या कंपन्या फक्त पेपर फोडण्यासाठी : जितेंद्र आव्हाडांचा संताप
Mhada Recruitment Paper Leak protest : जितेंद्र आव्हाडांनी राज्यात शासकीय नोकर भरती परीक्षा घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, त्या कंपन्या फक्त पेपर फोडण्यासाठी आलेल्या आहेत, अशा शब्दात संताप व्यक्त केला
Mhada Recruitment Paper Leak protest : म्हाडा भरती पेपर फुटी प्रकरणी आता राजकारण तापू लागले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शने केल्यानंतर आव्हाडांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाडांनी राज्यात शासकीय नोकर भरती परीक्षा घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, त्या कंपन्या फक्त पेपर फोडण्यासाठी आलेल्या आहेत, अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे. पेपर फुटला असता, पेपर फुटून परीक्षा दिली असती तर मेहनत करणाऱ्या मुलांच्या मेहनतीवर पाणी पडलं असतं. मागील तीन दिवसांपासून मी सांगतोय की मला एक टक्का जरी संशय आला तर मी परीक्षा रद्द करेल. मी डायरेक्ट परीक्षा रद्द केली नाही मी आधी इशारा दिला होता, असं आव्हाड म्हणाले.
आव्हाड म्हणाले की, आम्हाला जेव्हा पोलिसांनी हळूहळू चांगला सुरुवात सावध रहा केली. शेवटपर्यंत म्हणतो आम्ही परीक्षा घेऊ असं म्हणत होतो. जेव्हा त्यांच्या लॅपटॉपमध्ये परीक्षेचा पेपर मिळाला तेव्हा आम्ही गोपनीयतेचा भंग झाला आणि पेपर फुटला आहे अशी शंका घेत आम्ही पेपर रद्द केला. मला कळत नाही अभाविप आहे कोणाच्या बाजूने? मला हसू येते पेपर फुटलाच नाही तर मग निदर्शन कशाला, असं आव्हाड म्हणाले.
ज्या कंपन्या परीक्षा घेताय त्या कंपन्या वर्षानुवर्षे चालत आल्यात राज्याच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाने त्यांना पास केलं आहे. या सगळ्या कंपन्या उचलून बाहेर फेकून द्यायला पाहिजे. स्टाफ सिलेक्शन बँकेच्या परीक्षा ज्या कंपन्या या परीक्षा घेतात आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोघांसोबत टायप करून परीक्षा घ्याव्यात. ज्या परीक्षा या कंपन्या घेत आहेत त्या कंपन्यांना आधी फेकून द्या. कारण पेपर फोडण्यासाठी या कंपन्या आलेल्या आहेत. त्यांचं टेंडर इतक लो असतं की त्याच्यात परीक्षा बसू शकत नाहीत, असंही आव्हाड म्हणाले.
पुणे पिंपरी-चिंचवडच्या दोन लाख पोलिसांची परीक्षा या कंपनीने घेतली. जर ही परीक्षा व्यवस्थित झाली असं सांगितलं तर यांच्याबद्दल काय शंका व्यक्त करणार. पेपर फक्त एका माणसाला माहीत असतो आणि त्यानेच पेपर फोडला आणि मी त्याला वारंवार सांगितलं होतं. तो सावध झाला होता मात्र पोलिसांनी त्याला बरोबर पकडलं. आता म्हाडा याबाबत सगळी परीक्षा नियोजन करणार आहे. त्यामुळे याबाबत आमची आज दोन वाजता बैठक आहे, असं आव्हाडांनी सांगितलं.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जर अभाविपच्या कार्यकर्त्यांना चोप दिला असेल तर जर एखाद्या मंत्र्याच्या घरावर तुम्ही आंदोलन करत आहेत ते होणारच, असं आव्हाड म्हणाले.
संबंधित बातम्या
- आरोग्य विभागाच्या परीक्षेनंतर आता म्हाडाच्या पेपरफुटीचे मराठवाडा कनेक्शन, प्रकरण असं घडलं...
- म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला - जितेंद्र आव्हाड
- म्हाडा पेपरफुटी प्रकरण; जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अभाविपची निदर्शने