एक्स्प्लोर
मंत्री जितेंद्र आव्हाड होम क्वॉरंटाईन, कोरोना पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्याने निर्णय
मुंब्रा येथील एक पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्या अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई :गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला होम क्वॉरंटाईन करून घेतले आहे. मुंब्रा येथील एक पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्या अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात ठाणे येथील पत्रकार, कॅमेरामन देखील आल्याने त्यांनादेखील क्वॉरंटाईन होण्यास सांगितले आहे. माहितीनुसार, मुंब्रा येथे कार्यरत असणारा एका पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनाच पूर्वकाळजी म्हणून क्वॉरंटाईन होण्यास सांगण्यात आलं आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसंच एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचाही समावेश आहे. जितेंद्र आव्हाडदेखील या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात होते. यामुळे त्यांनाही होम क्वॉरंटाइन होण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांनी स्वत:ला क्वॉरंटाइन केलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या पार केली आहे. राज्यात आज 82 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2064 वर पोहोचली आहे. यापैकी एकट्या मुंबईत आज 59 नवे रुग्ण सापडले असून आतापर्यंत 1357 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णाची जिल्हानिहाय आकडेवारी ठाणे मंडळ एकूण मुंबई महानगरपालिका - 1357 ( मृत्यू - 92) ठाणे - 11 ठाणे मनपा - 44 (मृत्यू - 3) नवी मुंबई मनपा - 45 (मृत्यू - 3) कल्याण डोंबवली मनपा - 46 (मृत्यू - 2) उल्हासनगर मनपा - 1 भिवंडी निजामपूर मनपा - 1 मीरा भाईंदर मनपा 42 (मृत्यू - 1) पालघर - 6 (मृत्यू - 1) वसई विरार मनपा - 22 (मृत्यू - 3) रायगड - 4 पनवेल मनपा - 8 (मृत्यू - 1) Corona Update | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1982 वर, एकट्या मुंबईत 1298 रुग्ण नाशिक मंडळ नाशिक - 2 नाशिक मनपा - 1 मालेगाव मनपा - 27 (मृत्यू - 2) अहमदनगर 10 अहमदनगर मनपा -16 धुळे - 1 (मृत्यू - 1) जळगाव - 1 जळगाव मनपा - 1 (मृत्यू - 1) पुणे मंडळ पुणे - 7 पुणे मनपा -236 (मृत्यू - 30) पिंपरी चिंचवड मनप - 23 सोलापूर मनपा - 1 (मृत्यू - 1) सातारा - 6 (मृत्यू - 2) कोल्हापूर मंडळ कोल्हापूर - 1 कोल्हापूर मनपा - 5 सांगली - 26 सिंधुदुर्ग - 1 रत्नागिरी - 5 (मृत्यू - 1) औरंगाबाद मंडळ औरंगाबाद - 3 औरंगाबाद मनपा - 16 (मृत्यू - 1) जालना - 1 हिंगोली - 1 लातूर मंडळ लातूर मनपा- 8 उस्मानाबाद - 4 बीड - 1 अकोला मंडळ अकोला मनपा - 12 अमरावती मनपा -5 (मृत्यू - 1) यवतमाळ - 4 बुलढाणा - 13 (मृत्यू - 1) वाशिम - 1 नागपूर मंडळ नागपूर - 1 नागपूर मनपा - 27 (मृत्यू - 1) गोंदिया -1 संबंधित बातम्या
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग























