एक्स्प्लोर
Advertisement
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहावीच्या उर्वरित पेपरसह नववी, अकरावी परीक्षा अखेर रद्द
दहावीचा राहिलेला भूगोलचा पेपर अखेर रद्द करण्यात आलाय. त्याशिवाय नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दहावीचा भूगोलचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. त्याशिवाय नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दल एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिलीय. राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील परिक्षांबद्दलही उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही संबंधीत विद्यापीठातील कुलगुरू आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
दहावीचा भुगोलाचा पेपर दि. 21 मार्च 2020 रोजी घेण्यात येणार होता. मात्र, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. सद्यस्थितीत कोरोना पॉझिटीव्हचा राज्यातील आकडा पाहता हा राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढण्यात आला आहे. त्यामुळे दहावी उर्वरीत भूगोलाचा पेपर आणि नववी आणि अकरावीची परिक्षा रद्द करण्यात निर्णय घेण्याता आलाय. ज्यावेळी संचारबंदी राज्यात लागू करण्यात आली. त्यावेळी याबाबत तातडीने निर्णय घेऊन 14 एप्रिल नंतरची पुढील परिस्थिती पाहून हा पेपर कधी घ्यायचा हा निर्णय घेतला जाईल, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यावेळी सांगितलं होतं. पण सद्य परिस्थिती पाहता हा पेपर रद्द करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1895 वर; धारावी, मालेगाव, नागपुरात रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ
सरासरी गुण देण्याचा निर्णय
राज्यातील 18 लाख 64 हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास या विषयांचे पेपर दिले आहेत. आता भुगोलाचा पेपर राहिला होता. विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशावर या पेपरच्या गुणाचा परिणाम होणार नाही. याची खबरदारी घेतली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल पाच विषयांचाच लावायचा की पाच विषयांच्या गुणांची सरासरी करुन भुगोल विषयाला गुण द्यायचे याबाबत विचारविनिमय केला जातोय. शिवाय ज्या विषयांच्या उत्तरपत्रिका पडताळणी अन् फेरपडताळणीचे काम लॉकडाउनमुळे संथगतीने सुरु असल्याने निकालही लांबणीवर पडेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
Maharashtra Lockdown | लॉकडाऊनच्या काळात पोलिसांप्रमाणेच कॅश व्हॅनचे कर्मचारी कर्तव्यावर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement