एक्स्प्लोर

नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारी टोळी अटकेत, 139 लिटर दूध जप्त

मुंबईत गोरेगाव पोलीस ठाणे आणि बांगुरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही जण नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशवीत दूषित पाणी मिसळून ते ग्राहकांना वितरत करतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

मुंबई : मुंबईत नामांकित कंपन्यांच्या दुधामध्ये भेसळ करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखा युनिट नंबर 12च्या दोन पथकांनी ही कामगिरी यशस्वी पार पाडली. आरोपींकडून एकूण 139 लिटर भेसळयुक्त दूध आणि भेसळीसाठी वापरलं जाणारं इतर साहित्या ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईत गोरेगाव पोलीस ठाणे आणि बांगुरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही जण नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशवीत दूषित पाणी मिसळून ते ग्राहकांना वितरत करतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखा १२ ने दोन पथकं तयार केली. या पथकांमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे  अधिकाऱ्यांचा समावेश होता. यानंतर पथकाने गोरेगाव पश्चिममधील भगतसिंग नगर, लिंक रोड इथे छापा टाकला. या ठिकाणावरुन एका पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं. तर दुसऱ्या पथकाने हनुमाननगर गोरेगाव पश्चिममध्ये छापा टाकून दोघांना ताब्यात घेतलं. दोन्ही पथकांनी ताब्यात घेतलेले तीन पुरुष आणि एक महिला हे नामांकित अमूल गोल्ड आणि अमूल ताजा या दूध कंपन्यांच्या मूळ पिशव्या कात्रीने कापून, त्यामधील दूध काही प्रमाणात बाहेर काढून, त्यात दूषित पाणी मिसळायचे. त्या दुधाच्या पिशव्या स्टोव्ह पिन आणि मेणबत्तीच्या सहाय्याने पुन्हा सील करुन नामांकित कंपन्यांचे प्रमाणित दूध आहे असं भासवत. बेकायदेशीर लाभ मिळवण्याच्या इराद्याने ग्राहकांना या दुधाची विक्री करण्याच्या तयारीत होते. मात्र त्याच वेळी गुन्हे शाखा नंबर 12 च्या  दोन्ही टीमने आरोपींना पकडून त्यांच्याकडून एकूण 139 लिटर भेसळयुक्त दूध ताब्यात घेतलं. तसंच इथून दूध भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य, अमूल कंपन्यांच्या बनावट पिशव्या, प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करुन या चौघांना अटक केली. पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas:  त्यांनीच ऑर्डर सोडली असेल तर आकांचे आकाही जेलमध्ये जातील: सुरेश धस
त्यांनीच ऑर्डर सोडली असेल तर आकांचे आकाही जेलमध्ये जातील: सुरेश धस
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? नाशिकनंतर मुंबईत ओबीसी नेत्यांसोबत गाठीभेटी, घडामोडींना वेग
छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? नाशिकनंतर मुंबईत ओबीसी नेत्यांसोबत गाठीभेटी, घडामोडींना वेग
Success Story: पत्ताकोबीतून 54 लाखांचं उत्पन्न! सोलापूरच्या शेतकऱ्यानं 8 एकरात घेतलं उत्पादन, अडीच महिन्यात..
पत्ताकोबीतून 54 लाखांचं उत्पन्न! सोलापूरच्या शेतकऱ्यानं 8 एकरात घेतलं उत्पादन, अडीच महिन्यात..
धनंजय मुंडे अजितदादांच्या गाडीतून फडणवीसांच्या भेटीला, भास्कर जाधव संतापले; म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा, पण...
धनंजय मुंडे अजितदादांच्या गाडीतून फडणवीसांच्या भेटीला, भास्कर जाधव संतापले; म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा, पण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 डिसेंबर 2024 :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 21 December 2024Sanjay Raut Pune News : महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार? राऊतांच्या वक्तव्याने चर्चाRajkot Fort Update : राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा नव्यानं पुतळा उभारण्यात येणार #ABPmajha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas:  त्यांनीच ऑर्डर सोडली असेल तर आकांचे आकाही जेलमध्ये जातील: सुरेश धस
त्यांनीच ऑर्डर सोडली असेल तर आकांचे आकाही जेलमध्ये जातील: सुरेश धस
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? नाशिकनंतर मुंबईत ओबीसी नेत्यांसोबत गाठीभेटी, घडामोडींना वेग
छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? नाशिकनंतर मुंबईत ओबीसी नेत्यांसोबत गाठीभेटी, घडामोडींना वेग
Success Story: पत्ताकोबीतून 54 लाखांचं उत्पन्न! सोलापूरच्या शेतकऱ्यानं 8 एकरात घेतलं उत्पादन, अडीच महिन्यात..
पत्ताकोबीतून 54 लाखांचं उत्पन्न! सोलापूरच्या शेतकऱ्यानं 8 एकरात घेतलं उत्पादन, अडीच महिन्यात..
धनंजय मुंडे अजितदादांच्या गाडीतून फडणवीसांच्या भेटीला, भास्कर जाधव संतापले; म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा, पण...
धनंजय मुंडे अजितदादांच्या गाडीतून फडणवीसांच्या भेटीला, भास्कर जाधव संतापले; म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा, पण...
महायुतीत खातेवाटप नेमकं कधी होणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, रायगडच्या पालकमंत्रीपदावरही महत्त्वाचं भाष्य; म्हणाले...
महायुतीत खातेवाटप नेमकं कधी होणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, रायगडच्या पालकमंत्रीपदावरही महत्त्वाचं भाष्य; म्हणाले...
धबधब्यावर तरुण-तरुणीला विवस्त्र केले; पैसे काढून घेतले, पीडिता म्हणाली, मी विनवणी करत राहिलो, त्यांनी मला नग्न केले
धबधब्यावर तरुण-तरुणीला विवस्त्र केले; पैसे काढून घेतले, पीडिता म्हणाली, मी विनवणी करत राहिलो, त्यांनी मला नग्न केले
Mumbai Boat Accident: नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:चा जीव देऊन मोठा अनर्थ टाळला, अन्यथा नीलकमल बोटीचा स्फोट....
नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:चा जीव देऊन मोठा अनर्थ टाळला, अन्यथा नीलकमल बोटीचा स्फोट....
Maharashtra school uniform Scheme: सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शालेय गणवेश वाटपासंदर्भात मोठा निर्णय
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शालेय गणवेश वाटपासंदर्भात मोठा निर्णय
Embed widget