एक्स्प्लोर

म्हाडाची लॉटरी जाहीर, कोणत्या गटात किती घरं, किंमत किती, तुम्हाला ही घरं परवडतील का?

MHADA Lottery: मुंबईमध्ये म्हाडाची नवीन लॉटरी जाहीर, म्हाडा मुंबई मंडळातर्फे 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर, 9 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार.

MHADA Lottery Mumbai : मुंबईत (Mumbai News) स्वतःचं घर असावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. म्हाडाची (MHADA Lottery) नवी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. म्हाडा मुंबई मंडळातर्फे 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. 9 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील पहाडी गोरेगाव अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या सोडतीची जाहिरात 8 ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांत तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सदनिका सोडतीबाबत माहिती देणारी पुस्तिका या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.         

म्हाडाची घरं मुंबईतील कोणत्या भागात?

म्हाडाकडून ज्या 2030 घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे, त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरं उपलब्ध आहेत. मुंबई उपनगरातील  पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड याठिकाणी म्हाडाची घरे आहेत. म्हाडाच्या लॉटरीसाठी नेहमीप्रमाणे अत्यल्प (6 लाख), अल्प (9 लाख), मध्यम (12 लाख), उच्च उत्पन्न गट म्हणजे 12 लाखांपेक्षा अधिक  असे उत्पन्ननिहाय गट करण्यात आले आहेत. 

लॉटरीमधील घरांच्या किंमती किती? 

  • पहाडी गोरेगाव : 32 लाख 36 हजार 200 रुपये 
  • अँटॉप हिल-वडाळा : 41 लाख एक्कावन्न हजार रुपये 
  • कोपरी पवई : 1 कोटी 57 लाख रुपये 
  • कन्नमवार नगर-विक्रोळी : 30 लाख ते 52 लाख रुपयां दरम्यान 
  • शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड : 55 लाख 9200 रुपये 

कोणत्या गटासाठी किती घरं?

म्हाडाकडून ज्या 2030 घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे, त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरं उपलब्ध आहेत.

म्हाडाच्या अर्जाची किंमत किती?

अर्ज शुल्क 500/- रुपये + जीएसटी @ 18 टक्के, 90/- रुपये = एकूण 590/- रुपये अर्ज शुल्क विना परतावा

म्हाडा लॉटरीचं सविस्तर वेळापत्रक काय? 

  • सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरूवात दिनांक आणि वेळ - 9 ऑगस्त 2024 दुपारी 12 वाजल्यापासून
  • अनामत रक्कम भरण्याची दिनांक आणि वेळ - 9 ऑगस्ट 2024 दुपारी 12 वाजल्यापासून
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटचा दिनांक आणि वेळ - 4 ऑगस्ट 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत
  • अनामत रक्कम भरणा करण्यासाठी शेवटचा दिनांक आणि वेळ - 4 ऑगस्ट 2024 रात्री 11.59 वाजेपर्यंत
  • सोडतीसाठी प्राप्त अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्ध करण्याचा दिनांक आणि वेळ - 9 सप्टेंबर 2024 सायंकाळी 6 वाजता
  • प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे/हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक आणि वेळ - 10 सप्टेंबर 2024 दुपारी 12 वाजेपर्यंत
  • सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादी प्रसिद्धी दिनांक आणि वेळ - 11 सप्टेंबर 2024 सायंकाळी 6 वाजता
  • सोडतीचा दिनांक आणि वेळ -  13 सप्टेंबर सकाळी 11 वाजता
  • सोडतीचं ठिकाण - नंतर जाहीर करण्यात येईल

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

MHADA Lottery Mumbai : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी; आजपासून अर्ज नोंदणी सुरू, 13 सप्टेंबरला निकाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
Supriya Sule on Devendra Fadnavis : 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर आहेत त्यांना फडणवीसांनी सही करून कशी दाखवली? सुप्रिया सुळेंचा सवाल
70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर आहेत त्यांना फडणवीसांनी सही करून कशी दाखवली? सुप्रिया सुळेंचा सवाल
Bhum Paranda: मोठी बातमी : ठाकरे-पवारांना सर्वात मोठं यश, भूम परांड्यातील बंडखोरी रोखली, राहुल मोटे की राहुल पाटील, अधिकृत उमेदवार ठरला!
ठाकरे-पवारांना सर्वात मोठं यश, भूम परांड्यातील बंडखोरी रोखली, राहुल मोटे की राहुल पाटील, अधिकृत उमेदवार ठरला!
Nashik Central Assembly Constituency : नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदेंना मोठा दिलासा, दोन तगडे नेते माघार घेणार!
नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदेंना मोठा दिलासा, दोन तगडे नेते माघार घेणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange On Maharashtra Assembly 2024 : जरांगेंची माघार, पाडणार की तारणार?सकाळी १० च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 02 October 2024Manoj Jarange Not Contest Elections: गुपचूप जा आणि पाडा, जरांगेंची निवडणुकीतून माघार, पाडापाडीवर ठामKonkan Vidhan Sabha | कोकणच्या बालेकिल्ल्याचं आव्हान, मशाल विरूद्ध धनुष्यबाण रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
Supriya Sule on Devendra Fadnavis : 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर आहेत त्यांना फडणवीसांनी सही करून कशी दाखवली? सुप्रिया सुळेंचा सवाल
70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर आहेत त्यांना फडणवीसांनी सही करून कशी दाखवली? सुप्रिया सुळेंचा सवाल
Bhum Paranda: मोठी बातमी : ठाकरे-पवारांना सर्वात मोठं यश, भूम परांड्यातील बंडखोरी रोखली, राहुल मोटे की राहुल पाटील, अधिकृत उमेदवार ठरला!
ठाकरे-पवारांना सर्वात मोठं यश, भूम परांड्यातील बंडखोरी रोखली, राहुल मोटे की राहुल पाटील, अधिकृत उमेदवार ठरला!
Nashik Central Assembly Constituency : नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदेंना मोठा दिलासा, दोन तगडे नेते माघार घेणार!
नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदेंना मोठा दिलासा, दोन तगडे नेते माघार घेणार!
Manoj Jarange Not Contest Elections: गुपचूप जा आणि पाडा, जरांगेंची निवडणुकीतून माघार, पाडापाडीवर ठाम
गुपचूप जा आणि पाडा, जरांगेंची निवडणुकीतून माघार, पाडापाडीवर ठाम
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, आता पाडण्याचं काम करणार; नव्या भूमिकेतील 5 मोठे मुद्दे!
मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, आता पाडण्याचं काम करणार; नव्या भूमिकेतील 5 मोठे मुद्दे!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचं टेन्शन आणखी वाढलं; बंडखोर उमेदवार राजेश लाटकर नाॅट रिचेबल!
कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचं टेन्शन आणखी वाढलं; बंडखोर उमेदवार राजेश लाटकर नाॅट रिचेबल!
Lakshamn Hake on Manoj Jarange: 'जरांगे नावाचं वटवाघुळ औकातीवर आलं', मनोज जरांगेंच्या 'माघार'च्या निर्णयावर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया; म्हणाले...
'जरांगे नावाचं वटवाघुळ औकातीवर आलं', मनोज जरांगेंच्या 'माघार'च्या निर्णयावर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget