एक्स्प्लोर

मेट्रो-3चं काम वेगात, भुयारीकरणाच्या कामाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण असून, मेट्रो तीनसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं.

मुंबई : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रो-3च्या कामाला आता वेगानं सुरुवात होणार आहे. मेट्रो-3च्या पॅकेज 7 मधील भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मुंबईकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण असून, मेट्रो तीनसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं.

भुयार खोदणारं वैनगंगा-1 नावाचं टनेल बोअरिंग मशिन चालवून दाखवण्यात आलं. भुयारी करणाच्या या कामात आज 1.26 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्यात आला. वैनगंगा-1 या टनेल बोअरिंग मशिननं 259 दिवसांत हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं. 33.5 किमीची मेट्रो-3 ही देशातील पहिली भुयारी मेट्रो असणार आहे.

मुंबईतील कुलाबा-बांद्रा-सिप्झ या मेट्रो-3नं आपल्या कामाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. मरोळ पाली ग्राऊंड ते इंटरनँशनल एअरपोर्ट या मार्गावर भुयारीकरणाच्या कामाचा पहिला टप्पा आज यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे.

वैनगंगा-1 टनेल बोअरिंग मशिनची माहिती - वैनगंगा-1 हे 92 मीटर लांबीचं टनेल बोअरिंग मशीन शांघाय टनेलींग इंजीनिअरींग कंपनीनं तयार केलं आहे. - वैनगंगा-1 या टनेल बोअरिंग मशिनने 8 जानेवारी 2018 रोजी मरोळच्या पाली ग्राऊंड येथे भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात केली. - छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट पर्यंतचा 1.26 किमीचं भुयाराचा पहिला टप्पा 259 दिवसांत पार केला. - मुंबई शहराचा भूगर्भ बेसॉल्ट, ब्रेशिया, टूफ अशा प्रकारच्या कठीण खडकांचा आहे. त्यांना भेदत भुयारीकरण करुन वैनगंगा-1 नं आपली कामगीरी फत्ते केली. - वैनगंगा-1नं सध्या कार्यरत असणाऱ्या मेट्रो लाईन-1 आणि सहार उन्नत मार्ग यांसारख्या महत्वाच्या ठिकाणांखालून भुयारीकरण केलं.

मुंबई मेट्रो- 3 टप्पा - कुलाबा-वांद्रे-सिप्झ या 33.5 किमीच्या देशातील पहिल्या भुयारी मेट्रोचे काम सध्या मुंबईत सुरु आहे. - आतापर्यंत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं प्रकल्पातील सुमारे 9 किमीचं काम पूर्ण केलं आहे. - मुंबईत सध्या 17 भुयारीकरण यंत्रे 10 वेगवेगळ्या ठिकाणी भूगर्भात उतरवण्यात आली आहेत. 14 यंत्रांद्वारे भुयारीकरणाचं काम सुरु झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
आंदोलनामध्ये जोमाने उतरा, निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील राग रस्त्यावर दिसू द्या, उद्धव ठाकरेंच्या सूचना
आंदोलनामध्ये जोमाने उतरा, निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील राग रस्त्यावर दिसू द्या, उद्धव ठाकरेंच्या सूचना
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
MPSC : एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकरांच्या बदलीचं आणि अध्यक्ष भीमनवार यांच्या चौकशीचं आश्वासन मिळालं, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विद्यार्थी म्हणाले...
MPSC चे सचिव हरपाळकरांची बदली आणि अध्यक्षांच्या चौकशीचं आश्वासनं मिळालं, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विद्यार्थी म्हणाले...

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Aadhaar Card :  मोठी बातमी, दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय   
दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
Share Market : सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Pradeep Purnekar: ठाण्यात पोलीस स्टेशनबाहेर समर्थकांची मोठी गर्दी, कडक पोलीस बंदोबस्त; आदित्य ठाकरे, संजय राऊत ठाण्याकडे रवाना
ठाण्यात पोलीस स्टेशनबाहेर समर्थकांची मोठी गर्दी, कडक पोलीस बंदोबस्त; आदित्य ठाकरे, संजय राऊत ठाण्याकडे रवाना
Embed widget