एक्स्प्लोर
मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, एक्स्प्रेसवरही परिणाम
पश्चिम रेल्वेमार्गावर शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे आज वाहतूक सुरळीत असेल. रेल्वे रुळासह इतर तांत्रिक कामांसाठी हा मेगाब्लॉक घेतला जात आहे.
मुंबई : मध्य आणि हार्बर या रेल्वेमार्गांवर रविवारी (31 मार्च) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेमार्गावर शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे आज वाहतूक सुरळीत असेल. रेल्वे रुळासह इतर तांत्रिक कामांसाठी हा मेगाब्लॉक घेतला जात आहे.
पश्चिम रेल्वे
(शनिवार, 31 मार्च) रात्री 11.45 ते मध्यरात्री 2.45 वाजेपर्यंत आणि मध्यरात्री 1.30 पासून पहाटे 4.30 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवरील वसई रोड ते वैतरणा रोड दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला. अप जलद आणि डाऊन जलद अशा दोन्ही मार्गांवर हा मेगाब्लॉक होता.
वसई रोड ते वैतरणा रोड या स्थानकांदरम्यान घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतील. मध्यरात्री घेण्यात येणाऱ्या या मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी (1 एप्रिल) कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवरील मुलुंड ते माटुंगा मार्गावर आज (1 एप्रिल) सकाळी 11.15 ते संध्याकाळी 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. अप जलद मार्गावर हा ब्लॉक असेल.
कल्याण स्टेशनमधून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या दिवा ते परळ दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवून, परळनंतर पुन्हा गाड्या जलद मार्गावर धावतील. सीएसएमटीमधून सुटणाऱ्या जलद किंवा अर्धजलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकातही थांबतील. रत्नागिरी ते दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकापर्यंतच चालवली जाईल.
हार्बर रेल्वे
कुर्ला ते वाशी या मार्गावर आज (1 एप्रिल) सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर या मेगाब्लॉकचा परिणाम होईल.
मेगाब्लॉकवेळी सीएसएमटीपासून पनवेल, बेलापूर आणि वाशीसाठी सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पनवेल, बेलापूर आणि वाशी येथूनही सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement