एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावर दुरुस्ती आणि मेन्टेनन्सच्या विविध कामांसाठी आज रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.
मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावर दुरुस्ती आणि मेन्टेनन्सच्या विविध कामांसाठी आज रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.
मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर ठाणे ते कल्याण डाऊन फास्ट मार्गावर, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत ब्लॉकची कामे होणार आहेत. या मेगाब्लॉकमुळे लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेमार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार आहे. मेगाब्लॉकच्या कालावधीत हार्बर मार्गावरील लोकलची वाहतूक सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 वाजेपर्यंत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान बंद राहणार आहे.
पश्चिम रेल्वेमार्गावर शनिवारी रात्री ब्लॉक घेतल्यानं आज रविवारी कोणताही मेगाब्लॉक नसेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
निवडणूक
क्रीडा
Advertisement