एक्स्प्लोर
मुंबई लोकल : आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
रेल्वे ट्रॅक, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेसह इतर तांत्रिक कामांसाठी हा मेगाब्लॉक असून, याचा परिणाम पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवर होणार आहे.

फाईल फोटो
मुंबई : तांत्रिक कामांसाठी मुंबईतील तिन्ही रेल्वेमार्गांवर आज (22 एप्रिल) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे ट्रॅक, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेसह इतर तांत्रिक कामांसाठी हा मेगाब्लॉक असून, याचा परिणाम पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवर होणार आहे. पश्चिम रेल्वे बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार असून, बोरिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एक ते चार, तसेच राम मंदिर स्टेशनवर कोणतीही लोकल थांबणार नाही. मध्य रेल्वे मुलुंड ते माटुंगा या रेल्वेस्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 या वेळात मेगाब्लॉक घेतला जाईल. ब्लॉक दरम्यान कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या धीम्या लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर चालवल्या जाणार आहेत. नाहूर, कांजुरमार्ग, विद्याविहार स्थानकात अप धीम्या मार्गावरील गाड्यांना थांबा देण्यात येणार नाही. हार्बर मार्ग कुर्ला ते वाशी या रेल्वेस्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी दरम्यान अप-डाऊन मार्गावरील गाड्या रद्द करण्यात येतील. सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























