आठवडाभरात उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री आणि भाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात युतीच्या जागावाटपाची चर्चा
शिवसेना-भाजप जागावाटपासाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात चर्चा होणार आहे. येत्या आठवडाभरात ही चर्चा होणार आहे.
![आठवडाभरात उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री आणि भाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात युतीच्या जागावाटपाची चर्चा Meeting between Uddhav thackeray, CM devendra fadnavis & JP Nadda in mumbai very soon to discuss seat sharing आठवडाभरात उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री आणि भाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात युतीच्या जागावाटपाची चर्चा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/08085544/Shivsena-BJP.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाची प्राथमिक चर्चा काल पार पडली आहे. मात्र शिवसेना-भाजप जागावाटपासाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात चर्चा होणार आहे.
शिवसेना-भाजप युतीच्या प्राथमिक चर्चेत कोणत्या जागेवर कोण लढणार? आणि किती जागांवर लढणार? याबाबत चर्चा झाली. मात्र युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार याबाबत आता चर्चा होणार आहे. ही चर्चा दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये होणार आहे. येत्या आठवडाभरात ही चर्चा होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 9 सप्टेंबरला मुंबईत ही बैठक होणार आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात युतीच्या फॉर्म्युल्याला अंतिम रुप मिळू शकतं.
बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा झाली. त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजप-शिवसेना 270 जागा तर घटक पक्ष 18 जागा लढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजप 160, शिवसेना 110 आणि घटक पक्ष 18 जागा लढतील, असा प्राथमिक चर्चेतला फॉर्म्युला आहे.
कालच्या चर्चेत घटक पक्षांना जास्तीत जास्त 18 जागा देण्यावर दोन्ही पक्षांचं (शिवसेना - भाजप) एकमत झाल्याची चर्चा आहे. मात्र 288 पैकी 160 पेक्षा जास्त जागा भाजपला देण्यास शिवसेना तयार नाही. त्यामुळे या जागाबाबत येत्या आठवडभरात या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चो होऊ शकते.
VIDEO | पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच, मुंबईतील कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य | मुंबई
संबंधीत बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)