एक्स्प्लोर
Syrup Death: कफ सिरप प्यायल्याने ६ वर्षीय मुलाचा मृत्यू, यवतमाळमध्ये कुटुंबाचा दावा
यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील पिंपळखुटी येथे एका सहा वर्षीय मुलाचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 'सर्दी खोकल्याचं औषध घेतल्यानंतर मुलाची तब्येत बिघडली', असा गंभीर आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) तातडीने कारवाई करत खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमधील संबंधित कफ सिरपचे नमुने (Samples) जप्त केले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) कफ सिरपमुळे मुलांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच यवतमाळमध्येही तसाच प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
भारत
क्राईम
Advertisement
Advertisement


















