Measles Disease : गोवरचा उद्रेक! राज्यात आतापर्यंत 18 बालकांचा मृत्यू; तर 12,766 संशयित रूग्ण
Measles Disease : यावर्षी 2022 मध्ये गोवरचा उद्रेक 93 पटींनी वाढला आहे.

Measles Disease : गोवर (Measles Disease) हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, शरीरावर लाल पुरळ येणे ही गोवरची मुख्य लक्षणे आहेत. यावर्षी 2022 मध्ये गोवर उद्रेकाची संख्या जास्तच भितीदायक झाली आहे. 2022 मध्ये गोवरचा उद्रेक 93 पटींनी वाढला आहे.
राज्यातील गोवरची परिस्थिती
राज्यातील गेल्या चार वर्षातील गोवरच्या रूग्णांची परिस्थिती पाहता यंदाची परिस्थिती मात्र चिंताजनक आहे. 2019 मध्ये गोवरचा उद्रेक 3 वेळा झाला. तर 2020 मध्ये ही संख्या 2 वेळा झाला. अगदी मागच्या वर्षापर्यंत म्हणजेच 2021 मध्ये गोवरचा उद्रेक केवळ एकदाच झालेला. मात्र, यावर्षी 2022 मध्ये गोवर उद्रेकाची संख्या जास्तच भितीदायक झाली आहे. 2022 मध्ये गोवरचा उद्रेक 93 पटींनी वाढला आहे. यामध्ये 12,766 संशयित रूग्ण आहेत. तर मुंबईत 18 बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे. तर, तीन भिवंडी, दोन ठाणे मनपा, आणि एक वसई विरार शहरात झाला आहे.
गोवर संसर्गाची लक्षणे कोणती? (Symptoms of Measles Infection) :
गोवर आजारात सुरुवातीला तीव्र ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे अशी लक्षणे आढळतात. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साधारण लालसर पुरळ अंगावर येते. काही मुलांना जुलाब, उलटीचा सुद्धा त्रास होतो. हा ताप साधारण पाच ते सात दिवस अंगावर राहतो. यामध्ये काही मुलांना तीव्र श्वसनदाह, न्यूमोनिया, मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्व, अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामध्ये मुलं दगावण्याची सुद्धा भीती असते.
संसर्ग टाळण्यासाठी कशी काळजी घ्याल? How to prevent infection?
या आजारावर अत्यंत प्रभावी अशी MR आणि MMR अशी लस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. सर्व बालकांना या लसीचे दोन डोस देण्यात येतात. 9 महिने आणि 15 महिने वयोगटात या आजाराचे दोन डोस देण्यात येतात. त्याचबरोबर सेफ ड्रिकींग वॉटर, अजीवनसत्वाची मात्रा, सकस आहार, कुपोषण, कुपोषणावरील उपचार अशी उपाययोजना करून आपण ही साथ थांबवू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :
Measles Updates: गोवरची लक्षणं, कारणं आणि प्रतिबंधित उपचार; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
