एक्स्प्लोर

Measles Updates: गोवरची लक्षणं, कारणं आणि प्रतिबंधित उपचार; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Measles Updates: गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता विलगीकरण केलं जाणार असून टास्क फोर्सच्या बैठकीत यासंदर्भातील महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Measles Updates: गोवर (Measles Latest Updates) हा संसर्गजन्य आजार आहे. गोवर आजार संक्रमित व्यक्तीशी संपर्कामुळे अथवा संक्रमित वस्तू हाताळल्यामुळे पसरतो. गोवरसाठी कोणतेही विशिष्ट उपचार किंवा विषाणूविरोधी औषधं उपलब्ध नाहीत, व्हिटॅमिन 'ए' चा पूरक आहार आजारपणात प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त आहे. सध्या राज्यात गोवरचा वाढता प्रादुर्भाव आहे. या आजाराशी अनेक प्रश्न पालकांच्या मनात आहेत. याच सर्व प्रश्नांची उत्तरं नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमधील बाल-संसर्गजन्यरोग सल्लागार डॉ. धन्या धर्मपालन यांनी दिली आहेत. 

गोवर म्हणजे काय?

गोवर हा एक सांसर्गिक विषाणूजन्य आजार आहे, ज्यामुळे लक्षणीयरित्या मृत्यू होतात आणि विकृती देखील उद्भवते. जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा श्वास घेते तसेच वायूवीजन (हवेतील बारीक कण) श्वासाद्वारे आत घेतले जाते, तेव्हा गोवरचा प्रसार होतो.

गोवरची लक्षणं आणि कारणं?

बऱ्याचदा पूर्व अवस्थेत म्हणजे गोवरचे पुरळ दिसण्यापूर्वी 4-5 दिवस आधीच गोवरचा प्रसार होतो. गोवरच्या संपर्कात आल्यानंतर 7 ते 14 दिवसांच्या आत विषाणू संपूर्ण शरीरात प्रतिरुपित होतात आणि ताप, खोकला, पू-स्राव न होता डोळे लाल होऊन नाक वाहत राहते. कधीकधी उलट्या किंवा जुलाब होऊ शकतात. गालाच्या आतील भागात, विशेषतः खालच्या द्विदल दातांच्या समोर विशिष्ट पद्धतीचे 1 मिमीचे पांढरे ठिबके दिसतात ज्यास, कोप्लिक स्पॉट म्हणतात. पुरळ आल्यावर 72 तासांनंतर नाहिसे होतात. गोवर पुरळाचे लाल ठिपके आधी चेहऱ्यावर दिसू लागतात आणि नंतर 3 दिवसांत खाली धड, हात आणि पायांवर पसरतात. 3 दिवसांनंतर पुरळ जातात आणि तपकिरी किंवा तांबड्या रंगाचे डाग दिसून येतात. गोवरमध्ये न्यूमोनिया हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे आणि हा रोग दुय्यम सूक्ष्म रोगजंतूच्या संसर्गामुळे देखील उद्भवू शकतो. जे कुपोषित आहेत आणि ज्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी आहे, त्यांना गोवरचा तीव्र त्रास होऊ शकतो.

गोवरचे निदान?

प्रयोगशाळेत रक्तामध्ये गोवरचे विशिष्ट आयजीएम प्रतिपिंड आढळून आल्यावर निदान केले जाते (पुरळ आल्यानंतर सुमारे 2 दिवसांनी कळते). रोगजंतू शोध पीसीआरद्वारे घशातील स्वॅब आणि लघवीच्या नमुन्यांवरुन देखील घेतला जाऊ शकतो.

गोवर रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचं आहे का?  

गोवर योग्य प्रकारे प्रतिबंधित केला जाऊ शकतो. गोवर-रुबेला (एमआर) लस (9 आणि 16 महिन्यांत दिली जाते) म्हणून रुबेला (जर्मन गोवर) विरुद्ध संयोजनात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत गोवरची लस उपलब्ध आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने एमएमआर लस घेण्याची शिफारस केली आहे, ज्यामध्ये 9 महिने, 15 महिने आणि 5 व्या वर्षी गालगुंडाच्या लसीचा देखील समावेश आहे. गोवर रोखण्यासाठी दोन डोस खूप प्रभावी आहेत. जर एखाद्या मुलाला नमूद केलेल्या वयात लस दिली गेली नसेल तर गुंतागुंत टाळण्यासाठी लसीकरण लवकरात लवकर केलं पाहिजे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आता गोवरसाठी क्वारंटाईन! गोवर नियंत्रणासाठी विलगीकरण व्यवस्था करा, टास्क फोर्सचे जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना निर्देश

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
FSSAI School Food Guidelines : शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget