एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठी भाषा दिनानिमित्त अमेरिकन दूतावासात मराठीचा जागर
जागतिक मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून 'स्वास्थ्य' हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला. महाराष्ट्रासह भारतातील सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील माहिती आता मराठीतही उपलब्ध होणार आहे.
मुंबई : जागतिक मराठी भाषादिनानिमित्त जगभरात कार्यक्रम साजरे होत असताना, मुंबईतील अमेरिकन दूतावासही त्यात मागे नव्हतं. अमेरिकन कौन्सुलेट जनरलच्या साथीनं 'विकिपिडिया' या ज्ञानकोशाच्या माध्यमातून 'स्वास्थ्य' हा नवा उपक्रम गुरूवारी (27 फेब्रुवारी) जागतिक मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून सुरू करण्यात आला. महाराष्ट्रासह भारतातील सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील माहिती आता मराठीतही उपलब्ध होणार आहे. या क्षेत्राशी संबंधित डॉक्टर्स, सर्जन, जाणकार, वैद्यकीय महाविद्यालयातील प्राचार्य यांच्याकडनं लिहिलेल्या लेखांचं संग्रहीत स्वरूपात वाचन आता विकिपिडियावर मराठीतून करता येणार आहे. यात जवळपास सर्व आजार, रोग तसेच वैद्यकिय समस्यांचा समावेश असणार आहे.
अमेरिकी दूतावासात पार पडलेल्या या कार्यक्रमात याच संदर्भात एका चर्चासत्राचंही आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात राज्य सरकारतर्फे डॉ. सुधाकर शिंदे ज्यांच्यावर केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'आयुष्मान भारत' योजनेचीही जबाबदारी आहे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह डॉ. निशी सूर्यवंशी, मेडिकल मंत्रा या संकेतस्थळाचे संतोष आंधळे, पत्रकार मयुरेश कोण्णूर आणि शर्मिला कोलगुटकर यांचाही समावेश होता. यांच्यासह 'विकिपिडिया स्वास्थ्य'ची जबाबदारी सांभाळणारे अभिषेक सूर्यवंशीही या कार्यक्रमास उपस्थित होते. अमेरिकन दूतावासाच्या विस्तृत अशा ग्रंथालयात हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.
WEB EXCLUSIVE | #मराठीराजभाषादिन विकिपीडियाचा इतिहास, कशी झाली सुरुवात? काय आहे विकिपीडिया?
हल्ली प्रत्येक गोष्ट ऑनलाईन शोधण्याचा जमाना आहे. मग डॉक्टरांनी दिलेले सल्ले, सूचना असोत किंवा त्यांनी लिहून दिलेली औषध. ती औषध काय आहेत?, त्याचे काय परिणाम आहेत?, काय साईड इफेक्ट्स आहेत? आदी सर्व गोष्टी आज सर्रासपणे 'गुगल' सारख्या सर्च इंजिनवर धुंडाळल्या जातात. मात्र ऑनलाईन उपलब्ध असलेली सर्वच माहिती योग्य आहे आणि तेच ज्ञान आहे हे समजण्याची चूक केली जाते. त्यामुळे ब-याचदा गल्लत होऊन सर्वसामान्यांना दुष्परिणामांना समोरं जावं लागतं, अशी माहिती या जाणकारांनी दिली. आज वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित ऑनलाईन सर्चमध्ये सौंदर्यप्रसाधनं, वजन घटवणे किंवा वाढवणे, केस गळण्यावरील उपाय अशवा लैंगिक समस्यांबाबत माहिती मिळवू पाहणा-यांचीच संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे संधीसाधू अश्या लोकांनी इंटरनेटच्या माध्यमातून स्वत:ची दुकानं चालवण्यासाठी जाहिरातींच्या माध्यमातून खोटी आश्वासन देण्याचा सपाटा लावलाय. मात्र ती लिहिणा-याची विश्वासार्हता प्रत्येकवेळी तपासली जातेच असं नाही. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी पुढे येऊन मराठीत माहिती देण्याची गरज असल्याचं या चर्चासत्रात सर्व जाणकारांनी बोलून दाखवलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement