एक्स्प्लोर
Advertisement
... तर हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, मराठा आंदोलकांचा निर्धार
मराठा अरक्षणासंदर्भात सरकारने ठोस भूमिका न घेतल्यास हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा निर्धार आजच्या बैठकीत आंदोलकांनी केला.
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्यास हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलनाच्या मुंबईतील नियोजन बैठकीत देण्यात आला.
परळी येथील सकल मराठा आंदोलकांनी नऊ ऑगस्टला राज्यव्यापी मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी आज मुंबईत विक्रोळी पार्कसाईट येथे बैठक पार पडली.
मराठा अरक्षणासंदर्भात सरकारने ठोस भूमिका न घेतल्यास हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा निर्धार आजच्या बैठकीत आंदोलकांनी केला. सकल मराठा मोर्चाच्या राज्य समन्वयकांपर्यंत अशी भूमिका मांडण्यात येणार आहे.
त्यासोबत सात ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर पुन्हा एक बैठक बोलवण्यात आली आहे. नऊ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन लोकशाही मार्गाने करण्याचे आवाहनही आजच्या बैठकीत करण्यात आलं. या बैठकीला मुंबई पूर्व उपनगरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात आंदोलन सुरुच
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाचं आंदोलन सुरुच आहे. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आज धुळ्यात खासदार सुभाष भामरे यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. तर पालघरमध्येही मराठा संघटनांकडून धरणे आंदोलन केलं जाणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या परळीतल्या ठिय्या आंदोलनाचा आज 19 वा दिवस आहे.
पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चातर्फे काल भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलक घोषणा देत असताना स्वतः खासदार काकडेही त्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी देखील घोषणा दिल्या. भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात येतं असलेली लोकप्रतिनिधींच्या घरासमोरची आंदोलनं ही स्टंट आहेत असं वक्तव्य केलं. त्यानंतर आमदार मेधा कुलकर्णी यांच्या या वक्तव्याबाबत मराठा क्रांती मोर्चातर्फे आक्षेप घेण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement