एक्स्प्लोर
Advertisement
प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर? मागण्यांवर तोडगा न काढल्यास उद्या मंत्रालयावर धडक मोर्चा
दोन दिवसात सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला. सरकारने निर्णय दिला, पण प्रशासनातील अधिकारी न्याय देत नाहीत, असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाने केला.
ठाणे : मराठा क्रांती ठोक मोर्चाने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारने तोडगा न काढल्यामुळे सोमवारी 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मराठा समाज पुन्हा एकदा धडक मोर्चा काढणार आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.
सीएसएमटीवरून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिली आहे. दोन दिवसात सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला. सरकारने निर्णय दिला, पण प्रशासनातील अधिकारी न्याय देत नाहीत, असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाने केला. मोर्चा अडवल्यास ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मराठ समाजाच्या मागण्या?
- आंदोलन काळातील सरसकट सर्व गुन्हे मागे घ्यावे.
- 2014 च्या विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात.
- 72 हजार मेगा भरतीतील विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या द्याव्या.
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या द्याव्या.
- सारथी प्रशिक्षण संस्था मराठ्यांसाठी समिती द्यावी
- अण्णासाहेब पाटील महामंडळच्या सुलभ कर्ज योजना तात्काळ करा.
- शेतकऱ्यांना पीकविमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा.
- नरेंद्र पाटील यांना ताबडतोब निलंबित करा किंवा महामंडळ बरखास्त करा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement