पत्नीवर कॉमेंट केल्याने मित्राकडून बँकेतील रिलेशनशिप मॅनेजरची निर्घृण हत्या
पत्नीवर कॉमेंट केल्याने मित्रानेच बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.

मुंबई : एका खासगी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या 31 वर्षीय सुशीलकुमार सरनाईक यांची निर्घृण हत्या करण्यात आली. सुशीलकुमार सरनाईक याचा मृतदेह नेरळमध्ये सापडला असून त्याच्या मृतदेहाचे दहा ते बारा तुकडे करण्यात आले होते. सुशीलकुमार हे वरळी येथील राहणारे असून त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार वरळी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12 डिसेंबरला सकाळी 7.15 वाजता सुशीलकुमार बँकेतील मित्रांबरोबर विरार येथे पिकनिकला जात असल्याचे सांगून घरातून निघाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत येतो असं सुशीलकुमार याने घरच्यांना सांगितलं. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी सुशिलकुमार घरी आला नाही तेव्हा त्याची आई यल्लम्मा सरनाईक यांनी वरळी पोलीस स्टेशन येथे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
बलात्कार प्रकरणी पोलीस निरीक्षक 3 महिन्यानंतर अटकेत; 7 दिवसांची पोलीस कोठडी
सुशील कुमार याने घरी सांगितलं की तो विरारला जात आहेत. मात्र, तो विरारला न जाता त्याचा मित्र चार्ल्स सोबत नेरळ येथे गेला आणि दोघेही मद्यपान करू लागले. त्यातच सुशील याने चार्ल्सच्या पत्नी संदर्भात काही वक्तव्य केली. याचा राग मनात धरून चार्ल्सने सुनील वर चाकूने वार केले.
सुशीलची हत्या केल्यानंतर चार्ल्स त्याची पत्नी आणि मुलांसोबत हॉटेलमध्ये राहायला गेला. दुसऱ्या दिवशी बाजारात जाऊन चार्ल्स कटर घेऊन आला. सुशीलचा मृतदेह ज्या घरात होता तेथे येऊन चार्ल्सने सुशीलच्या मृतदेहाचे दहा ते बारा तुकडे केले आणि दोन वेगवेगळ्या बॅगेत भरले. त्यानंतर त्याने नेरळच्या रेल्वे ट्रॅक जवळ असलेल्या नाल्यात फेकून दिला.
फ्लाईटने मुंबईत येऊन चोरी करणाऱ्या बंगळुरुच्या ऑर्केस्ट्रा सिंगरला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई
नेरळ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. नाल्यात पडलेली बॅग ताब्यात घेऊन त्यांनी परिसराची झडती सुरू केली. तसेच सीसीटीव्हीच्या मदतीने त्यांनी चार्ल्सचा शोध लावला. चार्ल्सला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुशीलचा खून केल्याची कबुली दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
