एक्स्प्लोर

Mumbai News: मुंबईतील राममंदिर स्टेशनवर तरूणाने केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडीओ कॉल केला अन्...

Mumbai News: गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती. प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी ओरडू लागली.

मुंबई: मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती (Man helps deliver baby) वेदना सुरू झाल्या. राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकास बेद्रे या तरुणाने तात्काळ डॉक्टर मैत्रिण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासने यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली.(Man helps deliver baby) 

मिळालेल्या माहितीनुसार, काल (बुधवारी) रात्री १२.४० च्या सुमारास एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती. प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी ओरडू लागली. तिच्या मदतीसाठी कोणी धावून आले नाही. यावेळी त्यातच डब्ब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणाने तात्काळ ट्रेनची इम्रर्जन्सी चैन ओढली. यामुळे राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली. तरूणाने डॉ. देविका देशमुख यांनीही मध्यरात्रीची वेळ असतानाही माणुसकीच्या नात्याने लगेचच तो उचलून प्रतिसाद दिला. यानंतर देविका यांनी विकास बेद्रे यांना व्हिडीओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप समजावून सांगितली. विकास बेद्रे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही, डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचे तंतोतंत पालन केले.(Man helps deliver baby) 

Man helps deliver baby: नेमंक काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री सुमारे १२.४० वाजता गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेला लोकल ट्रेनमध्ये अचानक तीव्र प्रसूतीवेदना सुरू झाल्या. वेदना असह्य झाल्याने ती मदतीसाठी आरडाओरडा करू लागली, मात्र डब्यातील प्रवाशांपैकी कोणीही तिला तत्काळ मदत केली नाही. याच वेळी डब्यात प्रवास करणाऱ्या विकास दिलीप बेद्रे या तरुणाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ट्रेनची इमर्जन्सी चैन ओढली, ज्यामुळे लोकल राम मंदिर स्थानकावर थांबवण्यात आली. त्या क्षणी महिलेची अवस्था अत्यंत गंभीर होती, बाळ अर्धवट बाहेर आले होते आणि प्रसूती अर्धवट अवस्थेत अडकली होती. दरम्यान, राम मंदिर स्थानकावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या, तसेच रुग्णवाहिका येण्यासाठी वेळ लागणार होता. ही नाजूक स्थिती पाहून विकास बेद्रे यांनी वेळ न दवडता तात्काळ आपल्या मैत्रिणीला, डॉ. देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला आणि परिस्थितीची माहिती दिली. पुढे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रसूतीदरम्यान महिलेची मदत केली, ज्यामुळे आई आणि बाळाचे प्राण वाचले.

Man helps deliver baby: मध्यरात्री राम मंदिर स्थानकात बाळाच्या रडण्याचा आवाज अन् अभिनंदन

डॉ. देविका देशमुख यांनी मध्यरात्रीचा वेळ असूनही विकास बेद्रे यांचा व्हिडिओ कॉल तात्काळ उचलला आणि परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर त्यांनी विकासला शांतपणे प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजावून सांगितली. विकास बेद्रे यांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक सूचना काळजीपूर्वक पाळली. वैद्यकीय शिक्षणाचा कोणताही अनुभव नसतानाही त्यांनी अपवादात्मक धैर्य आणि संयम दाखवला. या तणावपूर्ण आणि जीवघेण्या प्रसंगी विकास यांनी दाखवलेले अफाट धैर्य आणि समयसूचकता हे खरोखर कौतुकास्पद ठरले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि राम मंदिर रेल्वे स्थानकावर रात्री सव्वा एक ते दोनच्या दरम्यान बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला. त्या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला, आणि उपस्थित प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने आई आणि बाळाला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवले, जिथे दोघांचीही प्रकृती सध्या सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विकास बेद्रे आणि डॉ. देविका देशमुख यांच्या तात्काळ प्रतिसादामुळे एका जीवाला नवसंजीवनी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manjeet Dhillon (@manjeet9862_)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
Gold Locker : एक तोळा, 10 तोळे, 50 तोळे, बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं? जाणून घ्या नियम
एक तोळा, 10 तोळे, 50 तोळे, बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं? जाणून घ्या नियम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार
Sanju Samson : संजू सॅमसन ऑस्ट्रेलियात असताना नवी अपडेट, राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार? IPL मध्ये 'या' संघातून खेळण्याची शक्यता
संजू सॅमसनची आयपीएलमधील टीम बदलणार, राजस्थान रॉयल्स मोठ्या निर्णय घेण्याच्या तयारीत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Majha Katta Nilesh Nalawade बारामतीत हायटेक शेती,Baramatiत वेदर स्टेशन सांगणार खत देण्याची अचूक वेळ!
Majha Katta Nilesh Nalawade : बारामतीत AI द्वारे ऊसाचं एकरी 120 टन उत्पादन कसं शक्य झालं?
Majha Katta Nilesh Nalawade Satya Nadella बारामतीच्या कृषी प्रयोगाने थक्क; Elon Musk नेही केले कौतुक
Majha Katta Nilesh Nalawade : बारामतीत AI ची कमाल! ऊसाचे उत्पादन एकरी 151 टन, शेतीत क्रांती
TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | 01 Nov 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
Gold Locker : एक तोळा, 10 तोळे, 50 तोळे, बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं? जाणून घ्या नियम
एक तोळा, 10 तोळे, 50 तोळे, बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं? जाणून घ्या नियम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार
Sanju Samson : संजू सॅमसन ऑस्ट्रेलियात असताना नवी अपडेट, राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार? IPL मध्ये 'या' संघातून खेळण्याची शक्यता
संजू सॅमसनची आयपीएलमधील टीम बदलणार, राजस्थान रॉयल्स मोठ्या निर्णय घेण्याच्या तयारीत
Uddhav Thackeray: या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raj Thackeray: कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
Uddhav Thackeray Speech : मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
Embed widget