एक्स्प्लोर
मुलीशी चॅटिंग केल्याने बापाची सटकली, तरुणाला किडनॅप करुन मारहाण
आपल्या मुलीसोबत व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करतो म्हणून सुनील दुबे याने त्याच्या साथीदारासह अंकित गुप्ता या तरुणाचं अपहरण केले.

नालासोपारा (पालघर) : मुलीशी व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करणाऱ्या तरुणाला मुलीच्या वडिलांनी किडनॅप करुन बेदम मारहाण केल्याचा प्रकार पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे घडला. अंकित गुप्ता असे 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. आपल्या मुलीसोबत व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करतो म्हणून सुनील दुबे याने त्याच्या साथीदारासह अंकित गुप्ताचं अपहरण केले आणि नालासोपारा पश्चिमेकडील गुरुकुल क्लासेसमध्ये डांबून ठेवले. तिथे अंकितला बेदम मारहाण केली. या प्रकरणी आरोपी सुनील दुबे याच्याविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अंकितवर नालासोपाऱ्यातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असून, नालासोपारा पोलीस फरार सुनिल दुबे आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
आणखी वाचा























