Crime News: 10 लाखांसाठी सुनेची हत्या, मालाड मालवणी परिसरातील धक्कादायक घटना
Crime News: मालाडमधील मालवणी परिसरातील एका महिलेची तिच्याच सासरच्या लोकांकडून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
Crime News: मुंबईतील(mumbai) मालाड येथील मालवणी हा परिसर अत्यंत गजबजेला परिसर आहे. मुंबईसारख्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाणही जास्त आहे. पण तरीही पोलीस प्रशासन गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे सतत प्रयत्न केले जातात. पण तरीही शहरातल्या गुन्हेगारीच्या बातम्या सतत समोर येतच असतात. आताही अशीच धक्कादायक घटना मुंबईतील मालवणी(Malvani) परिसरात घडली आहे. स्वत:च्याच मुलाला दिलेल्या पैशांसाठी सुनेची हत्या करण्यात आली आहे.
मुंबईतील मालाड येथील मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्कॅटर कॉलनीत ही घटना घडली. गुरुवारी रात्री सासरा, त्याची आई आणि त्याच्या बहिणीने मिळून सुनेची हत्या केली.10 लाखांच्या व्यवहारातून सून आयेशाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. पुढील तपास मालवणी पोलीस करत आहेत.
पोलीसांनी केली कारवाई...
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि आरोपींना अटक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 महिन्यांपूर्वी अकबर सय्यद यांनी मुलगा इरफान आणि सून आयशा यांना घर बांधण्यासाठी 10 लाख रुपये दिले होते. पण काही काळानंतर सासऱ्याने आपल्या सून आणि मुलाकडे पैशांसाठी तगादा सुरू केला. मात्र पैसे न दिल्याने त्यांच्याशी सतत भांडण व्हायचे. नंतर हा वाद आणखीनच वाढतच गेला.आठवडाभरापूर्वीही पैशांवरून असाच वाद सुरू झाला होता. मात्र हे वाद काही वेळात निवळायचे.
गुरुवारी (27 एप्रिल) रोजी संध्याकाळी किरकोळ भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. आजेसासू रोकय्या सय्यद आणि तिची मुलगी गौरी सय्यद यांनी सून आयेशाचे केस पकडून तिला जमिनीवर पाडले. त्यामुळे सून आयेशा जखमी झाली. तरीही तिला लाथा-बुक्क्यांनी तिच्या पोटावर आणि छातीवर इतके मारले. त्यानंतर तिच्या नवऱ्याने तिला उपचारांकरता रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरु होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. मालवणी पोलिसांनी सासरा अकबर सय्यद, त्याची आई रोकय्या सय्यद आणि बहीण गौरी सय्यद यांना मालवणी येथून अटक केली आहे. अकबर सय्यद याच्यावर याआधीही गुन्हे दाखल होते. परंतु त्याची आई आणि बहीण यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाही आहेत. या तिन्ही आरोपींना तीन मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या