Maharashtra Unlock Guidelines : ठाणे ,नवी मुंबईत कोरोना निर्बंध शिथिल; सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार
Maharashtra Corona guidelines : आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारने 4 मार्चपासून नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये आता ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात आले.
ठाणे : राज्यात कोरोना निर्बंध शिथील करण्यासाठी काल जाहीर झालेल्या राज्य शासनाच्या निकषांमध्ये मुंबईला पूर्ण शिथिलता तर बाजूलाच असलेल्या ठाणे जिल्ह्यात मात्र निर्बंध लागू करण्यात आले. या निकषांमध्ये महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक ग्राह्य धरले आहे. त्यामुळे या निकषांची पूर्तता करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे.
ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आज घेतला. तसेच कोरोना निर्बंधासाठीच्या निकषामध्ये मुंबई महानगराशी असलेली संलग्नता विचारात घेता ठाणे जिल्हा हा मुंबई महानगर क्षेत्राचा एक घटक समजण्यात यावा अशा आशयाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. आजच्या जिल्हा आपत्ती प्राधिकरणाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. या ऑनलाईन बैठकीत सर्व महापालिकांचे आयुक्त, अतिरक्त आयुक्त, उपायुक्त, पोलिस आयुक्त उपस्थित होते. त्यामुळे 4 मार्चपासून ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकातील नाट्यगृहे, सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळेही 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहे. इतर जिल्ह्यात मात्र 50 टक्के क्षमतेची अट कायम होणार आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली घट लक्षात घेऊन राज्य सरकारनं 14 जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरसह राज्यातील 14 जिल्हे पूर्णपणे अनलॉक करण्यात आले. या 14 जिल्ह्यांमध्ये ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकांचा समावेश नव्हता.
काय आहे नवे नियम?
- राज्यातील सर्व सरकारी, खासगी कार्यालये 100 टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास परवानगी
- शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी
- रेल्वे किंवा बसने प्रवास करताना लसीचे दोन डोस बंधनकारक
- चित्रपटगृहे , मॉल्स आणि इतर ठिकाणी प्रवेश देताना लसीचे दोन डोस बंधनकारक
- मनोरंजन व उद्याने जलतरण तलाव, वॉटर पार्क यांनाही पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याच्या परवानगी
- लग्नसमारंभ तसंच अत्यंसंस्कार विधी इत्यादींवरील निर्बंधही हटवले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :