मुंबईतील ओमायक्रॉनच्या समूह संसर्गावर जिनोम स्क्विन्सिंग अहवालानंतरच शिक्कामोर्तब, टास्क फोर्सच्या बैठकीतील निष्कर्ष
मुंबईत ओमायक्रॉनचा समूह संसर्ग झाला की नाही हे जिनोम स्क्विन्सिंग अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकानी म्हणाले.
![मुंबईतील ओमायक्रॉनच्या समूह संसर्गावर जिनोम स्क्विन्सिंग अहवालानंतरच शिक्कामोर्तब, टास्क फोर्सच्या बैठकीतील निष्कर्ष Maharashtra Task Force meeting Omicron community Spread in Mumbai will become clear after genome sequencing report says Suresh Kakani मुंबईतील ओमायक्रॉनच्या समूह संसर्गावर जिनोम स्क्विन्सिंग अहवालानंतरच शिक्कामोर्तब, टास्क फोर्सच्या बैठकीतील निष्कर्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/49b04ddf4b284205f25b79b93b47c4b7_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक झाली. बैठकीत सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आजच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. मात्र निर्बंध लावण्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली आहे. तसेच मुंबईत ओमायक्रॉनचा समूह संसर्ग झाला की नाही हे जिनोम स्क्विन्सिंग अहवालानंतरच स्पष्ट होईल असे देखील ते म्हणाले.
मुंबईत ओमायक्रॉनचा समूह संसर्ग झाला का हे अहवालानंतर स्पष्ट होईल
मुंबईत ओमायक्रॉनचा समूह संसर्ग (Community Spread) वाढला आहे, अशी माहिती समोर येत आहे. यावर काकणी म्हणाले, मुंबईत ओमायक्रॉनचा समूह संसर्ग झाला आहे की नाही हे सांगण्यात सध्याच्या घडीला कठीण आहे. 21 डिसेंबर पासून आलेल्या पॉझिटिव्ह केसेसचा जिनोम स्क्विन्सिंग अहवाल आज किंवा उद्या मध्ये येईल, त्यानंतर कळेल ओमायक्रॉनचा समूह संसर्ग झाला आहे की नाही? या अहवालानंतरच चित्र स्पष्ट होईल. या वाढीव रुग्ण संख्या आहे की ओमायक्रोनमुळे आहे की डेल्टामुळे की इतर विषाणूमुळे हे अहवालानंतर स्पष्ट होईल.
95 टक्के केस या इमारतीतून आहेत तर पाच टक्के केस या झोपडपट्टीतून चाळीतून
सध्या ज्या पॉझिटिव्ह केस समोर येत आहे त्यातील 95 टक्के केस या इमारतीतून आहेत तर पाच टक्के केस या झोपडपट्टीतून चाळीतून आहेत. 90 टक्के पेक्षा अधिक रुग्णांना कोणत्या प्रकारची लक्षणे नाहीत पाच टक्के पेक्षा कमी रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. वाढीचा दर हा खूप जास्त आहे आणि डबलिंi रेट हा एक किंवा दोन दिवस आहे, असे काकणी म्हणाले.
लहान मुलांच्या लसीकरणाची तयारी पूर्ण
लहान मुलांच्या 15 ते 18 वर्षाच्या लसीकरण सुरुवातीला मोठ्या जम्बो लसीकरण केंद्र मध्ये किंवा मोकळ्या जागेत लसीकरण केंद्रामध्ये केला जाईल अशा प्रकारचे नियोजन सुरू आहे. आपले दहा जम्बो कोव्हीड सेंटर तयार आहेत. टप्प्याटप्प्याने सेंटर सुरू करण्यात येणार आहे. 1 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पाचपेक्षा अधिक व्यक्ती एका जागेवर येऊ नये असे आदेश दिलेले आहेत. गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी ,मैदानी इथे सुद्धा लोकांनी गर्दी करू नये. पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासन सुद्धा गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)