एक्स्प्लोर

ED Raid Sanjay Raut : मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि सकाळी राऊतांवर कारवाई; चर्चांना उधाण

ED Raid Sanjay Raut : संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या टायमिंगबाबत लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

ED Raid Sanjay Raut : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री अचानकपणे केलेला दिल्ली दौरा आणि आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेली ईडीची कारवाई यातील संबंधाबाबत आता नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यात पुरामुळे नुकसान झालेल्या भागाच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला गेले होते. त्यानंतर दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली असल्याची माहिती होती. या दौऱ्यानंतर आज सकाळी राऊतांच्या घरी ईडीने कारवाई करणे, या योगायोगाबाबत चर्चा सुरू झाल्यात. 

संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्याने ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचले असल्याचे म्हटले जात आहे. याआधी संजय राऊत यांना दोन वेळा समन्स दिले होते. आज त्यांची चौकशी करायची असे आदेश दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर हे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी मुंबईतील एका चौकाच्या नामकरणाच्या कार्यक्रमात मराठी भाषिकांबाबत वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटले होते. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे भाजप, केंद्र सरकारवर जोरदार टीका सुरू झाली होती. शिवसेनेनेदेखील आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आज, संजय राऊत यांच्यावर कारवाई झाल्याने हा मुद्दा मागे पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  राज्यात ज्या-ज्या वेळी विविध प्रश्न निर्माण झाले, त्या प्रत्येक वेळी राज्यपालांनी महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित वादग्रस्त विधानं करून मूळ मुद्द्यावरून लोकांचं आणि माध्यमांचं लक्ष वळवण्याचं काम जाणीवपूर्वक केल्याची शंका लोकांकडून निर्माण केली जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. 

शिवसेनेत बंड झाल्यानंतर संजय राऊत यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आक्रमकपणे राऊत माध्यमांमध्ये मांडत असतात. काही दिवसांपूर्वीदेखील ईडीने संजय राऊत यांची 10 तास चौकशी केली होती. या चौकशीनंतरही संजय राऊत यांनी आक्रमकपणा कायम ठेवला होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; वैकुंठ एकादशीची टोकन्स वाटताना नेमकं काय घडलं?
तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; मंदिरात नेमकं काय घडलं?
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
Crime news: इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर, बनावट आयडी बनवून स्वत:च बनला कमिशनर; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
इन्कम टॅक्स अधिकाऱ्यासारखा लवाजमा, गाडीवर लाल दिवा; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
Cidco Homes : सिडकोनं  26 हजार घरांच्या किमती जाहीर करताच अर्जदार संतापले, धूळफेक  झाल्याचा आरोप, संजय शिरसाट म्हणाले...
घरांच्या किमती कमी करा, अन्यथा पैसे परत द्या, सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर होताच अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tirupati Balaji Temple Stampede : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू, 40 जखमीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 09 जानेवारी 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 09 Jan 2025 : Maharashtra PoliticsTop 100 Headlines : 6 AM : 09 Jan 2024 : टॉप शंभर बातम्या : Superfast News : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; वैकुंठ एकादशीची टोकन्स वाटताना नेमकं काय घडलं?
तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; मंदिरात नेमकं काय घडलं?
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
Crime news: इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर, बनावट आयडी बनवून स्वत:च बनला कमिशनर; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
इन्कम टॅक्स अधिकाऱ्यासारखा लवाजमा, गाडीवर लाल दिवा; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
Cidco Homes : सिडकोनं  26 हजार घरांच्या किमती जाहीर करताच अर्जदार संतापले, धूळफेक  झाल्याचा आरोप, संजय शिरसाट म्हणाले...
घरांच्या किमती कमी करा, अन्यथा पैसे परत द्या, सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर होताच अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवण्यासाठी अजितदादांचं अमित शाहांना साकडं? दिल्लीत गुप्तभेट, चर्चांना उधाण
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Embed widget