एक्स्प्लोर

Ed Raid on Sanjay Raut: संजय राऊत, अनिल परब...शिवसेनेचे कोणते नेते ईडीच्या रडारवर?

Ed Raid On Sanjay Raut: शिवसेनेचे काही महत्त्वाचे नेते ईडीच्या रडारवर आहेत. त्यातील काही जण एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत.

Ed Raid On Sanjay Raut: अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांवर भाजपकडून सातत्याने आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दाखल झालेल्या तक्रारीनुसार, शिवसेनेचे बडे नेते ईडीच्या रडारवर आले आहे. आज, रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीचे पथक शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या इतर नेतेदेखील ईडीच्या रडारवर आहेत. त्यातील काही आमदार, खासदार हे मागील महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडात सामिल झाले आहेत. 

कोणते नेते ईडीच्या रडारवर?

> प्रताप सरनाईक : टॉप सिक्युरिटीच्या कथित घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक हे ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने त्यांची व त्यांच्या मुलाचीही चौकशी करण्यात आली होती. त्याच्या मालमत्तेवरही ईडीने टाच आणली होती. प्रताप सरनाईक हे सध्या शिंदे गटात सामिल झाले आहेत. 

> भावना गवळी :  खासदार भावना गवळी यांच्यावर खोट्या सह्या करून ट्रस्टची कंपनी बनवून नॉन प्रॉफिट कंपनी असल्याचं दाखवून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. ईडीने भावना गवळी यांच्या ट्रस्टमधील जवळच्या सहकाऱ्याला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात जामीन मंजूर केला होता. भावना गवळी या सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाल्या आहेत. 

> अनिल परब : अनिल देशमुख चौकशी प्रकरणी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी एनआयए कोर्टाला लिहीलेल्या पत्रात अनिल परबांवर खंडणी वसूल करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्याशिवाय दापोली येथील रिसॉर्टच्या बांधकाम प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. अनिल परब परिवहन मंत्री असताना त्यांच्या शासकीय आणि खासगी निवासस्थानी ईडीने छापा मारला होता. जवळपास 10 ते 12 तास चौकशीही केली होती. अनिल परब हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात.  

> अर्जुन खोतकर :  अर्जुन खोतकर सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ED कडून चौकशी सुरू आहे. दहा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन अर्जुन खोतकर यांनी हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काही दिवसांपूर्वीच खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. काही कारणास्तव, अडचणींमुळे आपण एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले.

> आनंदराव अडसुळ : सिटी बॅंकेच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर आहे. सिटी बॅंकेत कामगार, पेंशनधारक अशा 99 टक्के मराठी माणसांची खाती होती. या बॅंकेतील पैसे बिल्डरांना अवैधरित्या वाटल्याचा आरोप करण्यात आला. यासाठी अडसूळांनी कमिशन घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. 

> संजय राऊत : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची काही दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती. पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्याशिवाय, संजय राऊत यांची पीएमसी प्रकरणासह पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू आहे. 

> यशवंत जाधव आणि यामिनी जाधव:  मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी  आमदार यामिनी जाधव हेदेखील केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहेत. काही महिन्यापूर्वी आयकर विभागाने त्यांच्या निवासस्थानी छापामारी केली होती. जवळपास तीन दिवस त्यांच्या घराची झडती, कागदपत्रांची तपासणी सुरू होती. बनावट कंपनीच्या आधारे आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. ईडीकडून ही त्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यशवंत जाधव आणि यामिनी जाधव हे शिंदे गटात सामिल झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget