Maharashtra News Updates 10 November 2022 : केडीएमसीतील तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती मिळावी अशी मागणी करणारी एक याचिका ईडीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. तसेच आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचा महाराष्ट्रातील चौथा दिवस असून त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते सामिल होणार आहेत. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत.
संजय राऊतांच्या जामिनावरील स्थगितीच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी
संजय राऊत यांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर आज सकाळी सुनावणी होणार आहे. ऑगस्ट 2022 रोजी संजय राऊतांना त्यांच्या निवास्थानातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर 102 दिवसांनी संजय राऊतांना पीएमएलए कोर्टाने जामिन मंजूर केला आहे.
राहुल गांधीच्या महाराष्ट्रातल्या पदयात्रेचा आज चौथा दिवस
राहुल गांधींनी सुरू केलेल्या पदयात्रेचा आज 64 वा आणि महाराष्ट्रातला आज चौथा दिवस आहे. सकाळी 6 वाजल्यापासून राहुल गांधी पदयात्रेला नांदेडच्या लोहा येथून सुरूवात करतील. दुपारी 4 वाजता देगलूर नाका येथून पुन्हा पदयात्रेला सुरूवात होईल. संध्याकाळी 6 वाजता न्यू मुंडा मैदान येथे राहुल गांधीची सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार आज यात्रेत सहभागी होणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
राज्यातील 92 नगरपरिषदांमध्येसुद्धा ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? महानगरपालिकामधल्या प्रभाग पद्धतीच्या बदलांना मान्यता मिळणार का? या बाबतच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका नेमक्या कधी होणार याचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. या प्रकरणाची सुनावणी आज नवे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर 21 व्या क्रमांकावर होणार आहे.
भारत- इंग्लंड सेमिफायनल सामना
टी 20 विश्व चषकातला आज दुसरा सेमी फायनल सामना भारत आणि इग्लंड दरम्यान होणार आहे. आज जर भारत जिंकला तर विश्व चषकाच्या अंतिम फेरीत भारत पोहोचणार असून त्याचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे.
मुंबई - गोवा हायवेवरील पेणनजीक संशयास्पद वस्तू आढळल्याने खळबळ
मुंबई - गोवा हायवेवरील पेणनजीक संशयास्पद वस्तू आढळल्याने खळबळ
पेणजवळील भोगावती पुलाच्या खालच्या बाजूला आढळली संशयास्पद वस्तू ...
पेण पोलीस घटनास्थळी दाखल...
दिपाली सय्यद विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक आक्रमक
Pune news: शिंदे गटात गेलेल्या दिपाली सय्यद यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक आक्रमक झाले आहे. पुण्यातील डेक्कन येथील गुडलक चौकात दिपाली सय्यद यांच्या विरोधात महिलांनी आंदोलन केलं. दिपाली सय्यद यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आलं. दिपाली सय्यद यांनी शिवसेना आणि रश्मी ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे महिला आघाडी आक्रमक झाल्याचं चित्र आहे. दिपाली सय्यद यांच्या विरोधात महिला शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Sudhir Mungantiwar: 'जगदंब तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणणार'; सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
Sudhir Mungantiwar: जगदंब तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणणार, छत्रपती शिवाजी महाराज यांची पुजेची तलवार ब्रिटनमधून जगदंब तलवार परत आणण्याच्या हालचालींना वेग वाढला आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे. 2024 पर्यंत तलवार आणण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
दापोली कोर्टाची अनिल परब यांना नोटीस, विवादीत साई रिसॉर्ट प्रकरणी दाखल तक्रारीवरून कोर्टाची कारवाई
दापोली कोर्टाची अनिल परब यांना नोटीस, विवादीत साई रिसॉर्ट प्रकरणी दाखल तक्रारीवरून कोर्टाची कारवाई
बेकायदेशीर बांधकाम करून परब यांनी पर्यावरण संवर्धनाचे नियम पायदळी तुडवल्याबाबत खुलासा करण्याचे निर्देश
Eknath Shinde : केडीएमसीतील तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल
शिवसेनेत फूट पडल्यावर शिंदे गटात मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवकांनी प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात आजही जोरदार इनकमिंग सुरु आहे. कल्याण डोंबिवलीतील तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते पदाधिकार्यानी काल मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
कल्याण ग्रामीणमधील माजी नगरसेविका पूजा म्हात्रे, कल्याण पश्चिमेतील माजी नगरसेवक गोरख जाधव, माजी नगरसेवक दत्ता गिरी यांच्यासह माजी नगरसेविका पूजा म्हात्रे यांचे पती आणि युवा पदाधिकारी योगेश म्हात्रे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या गटाला कल्याण डोंबिवलीतील 50 पेक्षा जास्त नगरसेवकांनी पाठिंबा देत त्यांच्या गटात सामिल झाल्याचे जाहीर केले होते. काल शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमधील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या