(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी 'मनसे' सज्ज
नवी मुंबई महापालिकेत मनसे स्वबळावर लढणार निवडणूक, आमदार राजू पाटील यांचे संकेत मनसैनिकांमध्ये निवडणुकीबाबत उत्सुकता.
नवी मुंबई : विविध स्तरांतील निवडणुकांची रणधुमाळी सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. त्यातच काही तुल्यबळ लढतींवर सर्वांचं विशेष लक्ष. निवडणुकींच्या याच रिंगणात आता स्वबळावर हे आव्हान पेलण्यासाठी राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सज्ज होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी आता राज ठाकरेंचा हा पक्ष 'मनसे' सज्ज होत आहे.
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईतील तीन शाखांचं उदघाटन रविवारी करण्यात आलं. यावेळी पक्ष आगामी पालिका निडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली. पाटील यांनीह ही बाब स्पष्ट करताच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
अमित ठाकरेंच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष...
तरुण मतरादारांना आकर्षित करण्यासाठी आणि नव्या पिढीचा राजकारणातील ओघ आणखी वाढवण्याच्या दृष्टीनं राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना सक्रीय राजकारणाच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. अमित ठाकरे यांचा आश्वासक चेहरा आणि त्यांची कामगिरी या साऱ्याचा पक्षाच्या वाटचालीत मोलाचा हातभार लागणार आहे.
याच धर्तीवर पक्षाच्या शाखांचं उदघाटन करण्यासाठी आलेल्या अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शिवाय नवी मुंबई राजकीय वर्तुळातील सद्यस्थिती, तेथील राजकीय वातावरण आणि उमेदवारांची तयारी या साऱ्याचा त्यांनी आढावाही घेतल्याचं म्हटलं जात आहे.
CoWIN Management साठी केंद्र सरकारकडून मिळाल्या महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना
राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात
राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला ठाकरे सरकारनं दणका दिला आहे. राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आल्यामुळे मनसे सैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे.