एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Navi Mumbai : भूमिगत वाहिनीतून डिझेल गळती झाल्याने लागलेल्या आगीत 15 झाडे जळून खाक

Navi Mumbai Fire : महापे येथील शिळफाटा रस्त्यावर अडवली भुतावळी गावानजीक जंगलात ही आग लागली. याच ठिकाणी भूमिगत डिझेल वाहिनी असून त्यातून गळती झालेल्या डिझेलवर ठिणगी पडून सदर आग लागली.

नवी मुंबई : महापे एमआयडीसीमध्ये सकाळी लागलेल्या आगीत झाडे जळून खाक झाली आहेत. तर येथील काही झोपड्यांचेही नुकसान झाले आहे. या भागातून डीझेलची भूमिगत वाहिनी गेली आहे. या भूमीगत वाहिनीतून झालेल्या डिझेल गळतीमुळे ही आग लागली होती.  भारत पेट्रोलियमच्या आधिकाऱ्यांनी तपासणी केली असता पाईपलाईनला पाडलेले छिद्र आढळले. त्यामुळे येथून कुणीतरी डिझेल चोरी करत असून या गळतीमुळेच ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि एमआयडीसी अग्निशमन विभागाच्या माध्यामातून लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. 

महापे येथील शिळफाटा रस्त्यावर अडवली भुतावळी गावानजीक जंगलात ही आग लागली. याच ठिकाणी भूमिगत डिझेल वाहिनी असून त्यातून गळती झालेल्या डिझेलवर ठिणगी पडून सदर आग लागली. सध्या उन्हाळा असल्याने परिसारातील झाडे वाळलेली असल्याने झाडांनीही पेट घेतला तर जवळच असलेल्या काही झोपड्याही आगीच्या भक्षस्थानी पडल्या. तसेच या परिसरात वखार गोडाऊन मधील सामान वेळीच हलवल्याने त्याचे फारसे नुकसान झाले नाही. आग विझवण्यासाठी सिडको , कोपरखैरणे, ऐरोली, ठाणे, रबाळे व पावणे एमआयडीसीच्या अग्निशमन गाड्या दाखल झाल्या होत्या. आग डिझेलमुळे लागल्याने आग विझवून देखील पुन्हा पुन्हा आग लागत असल्याने अखेर फोम मारून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. यावेळी  38 अधिकारी , कर्मचारी यांना आग विझविण्यासाठी पाच  तास प्रयत्न करावे लागले असल्याचे  एमआयडीसीचे फायर अधिकारी रायबा पाटील यांनी सांगितले. 

येथे भूमिगत असालेली डीझेल वाहिनी ही मुंबई - दिल्ली असून भारत पेट्रोलियम कंपनीची आहे . आगीची घटना कळल्यावर त्यांचीही रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली होती. यावेळी त्यांनी पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने डिझेल वाहिनीला छिद्र करून डिझेल चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. याच छिद्रातून डिझेल थेंब थेंब झिरपत होते जे नजीकच्या नाल्यापर्यंत पोहचले होते. त्यामुळे आग विझवण्यास पाण्याऐवजी फोम वापरावे लागले.

संबंधित बातम्या :

Jalgaon : अवकाशातून उपग्रहाचे अवशेष पडून घराला आग, जळगावातील कुटुंबाचा दावा

Nashik : नांदूर मध्यमेशवर पक्षी अभयारण्यातील आग अजूनही धुमसतीच, पक्ष्यांचा अधिवास धोक्यात

Mumbai Crime : आधी एटीएममधील 77 लाखांची चोरी, नंतर एटीएम मशीनच पेटवली, कॅश लोड करणाऱ्या दोघांना अटक

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 27 November 2024JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतलाDelhi Meeting On Maharashtra Cabinet:  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Pushpa 2 Third Part Hint : पार्ट 2 मध्येच संपणार 'पुष्पा'ची कहाणी? सेटवरुन काढलेला शुटिंगदरम्यानचा शेवटचा फोटो व्हायरल
पार्ट 2 मध्येच संपणार 'पुष्पा'ची कहाणी? सेटवरुन काढलेला शुटिंगदरम्यानचा शेवटचा फोटो व्हायरल
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
Embed widget