एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Rains : मुंबईत चुनाभट्टी भागात दरड कोसळली, घरांचं नुकसान, 3 जखमी

Maharashtra Mumbai Rain : मुंबईतील चुनाभट्टीच्या नागोबा चौक परिसरात डोंगराचा भाग कोसळला असून डोंगराचा भाग कोसळल्यानं घरांचं नुकसान झालं असून तीनजण जखमी झाले आहेत.

Maharashtra Mumbai Rain : सततच्या पावसामुळे चुनाभट्टीत (Chunabhatti) डोंगर कोसळला आहे. मुंबईतील चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरातील डोंगर भाग कोसळला आहे. घटनेबाबत माहिती मिळताच चेंबूर (Chembur) अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तत्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आलं असून तीन जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. तिघंही जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास ही घटना घडली. डोंगराचा काही भाग लागून असणाऱ्या घरांवर कोसळला आणि ही दुर्घटना घडली. या घटनेत तीनजण जखमी झाल्याची सध्या माहिती मिळत आहे. तिघांनाही जवळच असणाऱ्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वचावकार्य सुरु केलं. सध्या अग्निशमन दलाच्या वतीनं त्याठिकाणी साठलेला मलबा बाजूला करण्याचं काम सुरु आहे. सुदैवानं कोणतीबी जीवीतहानी झालेली नाही.

रात्रभर उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासूनचं मुंबईसह उपनगरांत दमदार हजेरी लावली आहे. अनेक सखल भागांत पाणी साचलं असून वाहतूकही संथ गतीनं सुरु आहे. अशातच कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. कालही घाटकोपर येथे दरड कोसळली होती. मुंबईच्या घाटकोपर भागात खंडोबा टेकडीवर असलेल्या पंचशील नगर येथे एका घरावर दरड कोसळली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचं मोठं नुकसान झालं होतं. 

दरड कोसळली त्यावेळी संपूर्ण कुटुंब होतं घरात

घाटकोपरमध्ये ज्यावेळी घरावर दरड कोसळली, त्यावेळी त्या घरात राहणारे संतोष उपाले आणि त्यांचं कुटुंब असे पाच जण घरात होते. अचानक आवाज झाला आणि दरडीसह एक मोठं झाड घरावर कोसळलं. भयभीत होऊन संपूर्ण कुटुंब जीव मुठीत घेऊन बाहेर पळालं. जीव वाचला, मात्र घराचं आणि घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. झाड आणि दरड काढण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात आलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Mumbai Rain Live : मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा, नालासोपाऱ्यात शाळांना सुट्टी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Nagpur :  नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर बॅनरबाजीAmit Shah - Vinod Tawde Meet: अमित शाह-विनोद तावडेंच्या भेटीची इनसाईड स्टोरीABP Majha Headlines :  8 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  28  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
Embed widget