एक्स्प्लोर

Mahim Majar : राज ठाकरेंचं अल्टिमेटम, मजारीभोवतीचं बांधकाम हटवलं; माहिम दर्ग्यामागील वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण

Mahim Majar : माहिम (Mahim) समुद्रातील वादग्रस्त मजारीभोवतीचं अनधिकृत बांधकाम (Unauthorized construction) हटवण्यात आलं आहे.

Mahim Majar : माहिम (Mahim) समुद्रातील वादग्रस्त मजारीभोवतीचं अनधिकृत बांधकाम (Unauthorized construction) हटवण्यात आलं आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई महापालिकेचं (Mumbai Palika) अतिक्रम विरोधी पथक माहीमच्या समुद्रात दाखल झालं होतं. त्यानंतर कारवाई सुरु करण्यात आली होती. अखेर माहिम दर्ग्यामागील वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण झाली आहे. दरम्यान, माहिम किनारा परिसर आणि दर्ग्याभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अखेर राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर माहिम दर्ग्याच्या मागे असणाऱ्या वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण झाली. 

माहिम किनारा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात 

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी या मजारीचा उल्लेख केला होता. हे अनधिकृत बांधकाम जर एक महिन्यात पाडलं नाही तर आम्ही तिथं गणपतीचं मंदिर बांधू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर अवघ्या 12 तासांच्या आत कारवाईला सुरुवात झाली होती. दरम्यान, माहिम किनारा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशसानं योग्य ती दक्षता घेतली आहे. कारवाईत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही.

सकाळी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल झालं होतं

माहिम समुद्रातील मजारीचं मॅपिंग करण्यात आलं  आहे. महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाचे अधिकारी माहीम समुद्रातील ठिकाणावर पोहोचले आहेत. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मॅरिटाईम बोर्डाला जाग आल्याचे बोलले जात आहे. माहिमच्या वादग्रस्त मजारीच्या ठिकाणी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल झालं आहे. तसेच एक जेसीबी देखील त्या ठिकाणी तयार ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, माहिम समुद्रामधील या ठिकाणावर माहिम दर्गा ट्रस्टनं मोठा दावा केला आहे. ही जागा 600 वर्ष जुनी आहे. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणं ती आताच बांधलेली नाही. मुळात, हजरत मकदूम अली शाह हे याच जागी बसून हजरत ख्वाजा खिजर अली शाह यांच्याकडून शिक्षण घ्यायचे. ही ऐतिहासिक जागा आहे. तिथं दर्गा उभारण्याचा आमचा कुठलाही विचार नाही, असं माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांनी सांगितलं.

राज ठाकरेंनी दिली होता इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (22 मार्च) झालेल्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात खळबळजनक दावा केला आहे. माहीमजवळ समुद्रात अनधिकृत दर्गा उभारला जात असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी त्याचा व्हिडीओच जाहीरपणे दाखवला. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनधिकृ दर्ग्यावर कारवाई करावी, अशी थेट मागणी राज ठाकरेंनी केलीय. ही मागणी करताना, राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम देखील दिला आहे. जर हा दर्गा हटवला नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mahim Majar : माहीमच्या वादग्रस्त मजारीवर कारवाई? मजारीच्या ठिकाणी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
Video: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; समोरुन आली SP ऑफिसरची गाडी, रस्त्यावरील रोमान्स अंगलट
Video: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; समोरुन आली SP ऑफिसरची गाडी, रस्त्यावरील रोमान्स अंगलट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Dilip Walse Patil : महायुतीचा उमेदवार विजयी होणार, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वासUday Samant On Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून गंभीर आरोप;शिवसेनेची प्रतिक्रिया काय?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM: 13 May 2024: ABP MajhaAmol Kolhe Shirur Lok Sabha :आचारसंहिता धाब्यावर बसवायची असेल तर, इतका बडगा कशासाठी?, कोल्हेंचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
Video: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; समोरुन आली SP ऑफिसरची गाडी, रस्त्यावरील रोमान्स अंगलट
Video: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; समोरुन आली SP ऑफिसरची गाडी, रस्त्यावरील रोमान्स अंगलट
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
कामाची बातमी! सरकारी नोकर भरती, दरमहा 35000 कमावण्याची संधी; विनापरीक्षा होणार निवड
कामाची बातमी! सरकारी नोकर भरती, दरमहा 35000 कमावण्याची संधी; विनापरीक्षा होणार निवड
Embed widget